पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील विविध विकास कामांचे शुद्धी प्रत्रक काढून प्रतीक्षा यादीद्वारे समसमान वाटप करणे – विलास लांडे

0
16
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

पिंपरी / शबनम न्युज

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील दैनंदिन रस्ते,गटर्स,साफसफाई कामे बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग घेणेसाठी  कामाचे समसमान वाटप करणे. असे मागणीचे निवेदन भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.

 

 

 

 

 

दिलेल्या निवेदनामध्ये म्हंटले आहे कि, शहरातील दैनंदिन रस्ते,गटर्स,साफसफाई यांत्रीकी पद्धतीने साफसफाई कंची नोटीस क्र.७ – १ /२०२०-२१ नुसार अनुक्रमे अ,ब,क,ड,ई,फ,ग,व,ह या ८ क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत येणा-या कार्य क्षेत्रातील दैनंदिन रस्ते,गटर्स,साफसफाई यांत्रीकी पद्धतीने साफसफाई कामासाठी कामगार नेमण्यासाठी निविदा मागविल्या आहेत.दि.१२/१०/२०२० रोजी आपण ८ प्रभाग स्तरावर व ५०० लोकांची कामे केलेली अट तसेच निविदेचा फार्म फी ४२५६०/- प्रती प्रभाग व बयाणा व अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे असे नमूद केल्यामुळे सादर निवेदेमध्ये स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांना या जाचक अटीमुळे निविदा भरताना अडचणी निर्माण होणार आहेत.
तसेच सदर प्रकरणी अशा कामांचे कंत्राट बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना देणे बंधनकारक असताना देखील खाजगी कंपन्यांना अशी कामे दिल्याचे निर्देश दिसून येत आहे. तसेच शाशन निर्णय क्र.रोस्वरो-२००२/प्र.क्र.२६७/रोस्वरो-१ दि.१७ ऑगस्ट २००२ रोजीच्या पारीत केलेल्या आदेशानुसार बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना आर्थिकदृष्टया सक्षम व बळकट करणे असे निर्देश देणेत आलेले आहेत. त्या अनुषंगाने बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना मिळणयासाठी सातत्याने मागणी केली आहे.

त्यामुळे सध्या काढलेली निविदा प्रक्रीया रद्ध करून सन २०१४-१५ च्या निविदेप्रमाणे सहभाग नोंदवून प्रतिक्षा यादी मधील सहकारी संस्थाना कामाचे समसमान पद्धतीने कामे मिळणे गरजेचे आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील दैनंदिन रस्ते,गटर्स,साफसफाई कामे बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग घेणेसाठी जुनी निविदा रद्द करून किंवा सुद्धीप्रत्रक काढून प्रतीक्षा यादीद्वारे कामाचे समसमान वाटप करणे असे हि विलास लांडे यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.