कल्याणकारी योजनांचा लाभ जेंव्हा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचेल, तेंव्हाच आपले ध्येय पूर्ण होईल – नगरसेविका प्रियांका बारसे

0
168
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत महिला व बालकल्याण योजना अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजना प्रभावी पणे राबविण्यात येत आहेत विद्यमान नगरसेविका प्रियांका बारसे यांच्याजनसंपर्क कार्यालया मार्फत प्रभागातील नागरिकांपर्यंत या सुविधा सक्षम पणे पोचविल्या जात आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत महिला व बालकल्याण योजना अंतर्गत अटल बिहारी वाजपेयी विधवा घटस्फोटीत महिला यांना घरगुती व्यवसायासाठी अर्थसहाय्य साठी आठ महिला तसेच मागासवर्गीय कल्याणकारी योजना माता रमाई आंबेडकर ,पाचवी ते सातवी विद्यार्थ्यांना चार हजार रुपये शिष्यवृत्ती , आठवी ते दहावी विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये शिष्यवृत्ती साठी एकूण 81 विद्यार्थ्यांनी कार्यालयाशी संपर्क साधला.त्याचप्रमाणे इयत्ता दहावीतील 80 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणारे दहावीचे विद्यार्थी परीक्षा 2020-21 मध्ये 80 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणारेंना रू. 15000/- व , 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळवणारेंना रुपये 25000/- शिष्यवृत्ती यासाठी 72 विद्यार्थ्यांनी प्रियांका प्रवीण बारसे जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज भरून जमा केले आहेत .अशी माहिती नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या जनसंपर्क कार्यालया मार्फत देण्यातआली आहे

आज शेवटचा दिवस असून नागरी सुविधा केंद्रामध्ये फॉर्म भरून त्याच्या पावत्या आणलेल्या आहेत आणि आता त्या पिचिमनपातील नागरवस्ती विभागात जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरसेविका सौ प्रियांका बारसे यांनी सर्वांना दिली आहे.

या वेळी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी नागरिकांचा हाच जनसंपर्क कोणत्याही कार्याला यशापर्यंत पोहोचवत असतो., नागरिकांसाठी अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आणि गरजेला त्यांच्या उपयोगी पडणे हेच माझ्या कार्याचे ध्येय आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सर्व माहिती – योजनांचा घेऊन सहारा
सुविधांचा राहील गवळीनगरवर नेहमीच मारा

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous articleआमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जिल्हास्तरिय बुद्धिबळ आमदार चषक’ स्पर्धेचे चिंचवडगावात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Next articleनगरसेवक राहुल भोसले यांच्या माध्यमातून नेहरूनगर परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी लागला मार्गी