कोरोना कालावधीनंतर शाळेत करावयाच्या गरजेच्या कामांची सुचना संबंधित विभागाला देण्याची नगरसेविका प्रियांका बारसे यांची अतिरिक्त आयुक्तांकडे मागणी

0
149
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील मुख्याध्यापक सहविचार सभेत मुख्याध्यापकांना केले मार्गदर्शन

शबनम न्युज / पिंपरी

कोरोना कालावधीनंतर शाळेत करावयाच्या गरजेच्या कामांची सुचना संबंधित विभागाला देण्याची मागणी निवेदनाद्वारे नगरसेविका प्रियांका बारसे यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात नगरसेविका बारसे यांनी म्हंटले आहे कि, शासन आदेशानुसार पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील नववी- दहावीचे वर्ग सुरू झालेले आहेत . लवकरच पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत.

 

 

तथापि शाळा सुरू करण्यापूर्वी ची पूर्वतयारी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शाळेत सुरू होणे गरजेचे आहे . आरोग्य विभागाला मनपा क्षेत्रातील सर्व शाळा सनीटराईझ करून घेणे.  स्वच्छता विभागाला सर्व शाळा स्वच्छ करून झाडून घेणे . पाणीपुरवठा विभागाला पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय आहे व शाळेतील इतर गरजेची कामे तीन दिवसांच्या मुदतीत करून देण्याच्या सूचना आपण त्या त्या विभागाला द्याव्यात .

 

 

त्याचा अहवाल शिक्षण समितीला द्यावा अशी मागणी शिक्षण समिती सदस्या प्रियांका बारसे यांनी केली.

तसेच आज सोमवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मुख्याध्यापक सहविचार सभेत उपस्थित राहून सर्व मुख्याध्यापकांना कोरोना कालावधीनंतर शाळा सुरू करताना कोणती काळजी घ्यायला हवी या बाबतच्या सूचना नगरसेविका प्रियांका बारसे यांनी मार्गदर्शनपर सांगितल्या

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous article“मराठी” भाषेचा वापर सरकारी कार्यालयीन कामकाजामध्ये सक्तीचा करावा – माजी खासदार गजानन बाबर
Next articleडॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात कोविड १९ लसीकरण अभियानाला उत्साहात सुरुवात