किवळे आणि विकासनगर परिसरातील महावितरणाच्या उघड्या डीपींना झाकणे बसवावीत – राजेंद्र तरस

0
85
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्युज / पिंपरी

किवळे आणि विकास नगर परिसरात अनेक ठिकाणी महावितरणच्या डीपींना झाकणे नाहीत, काही ठिकाणी झाकणे तुटलेले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने या भागातील बसवावी व तसेच नादुरुस्त दुरुस्ती करावी, असे मागणीचे निवेदन युवा शिवसैनिक राजेंद्र तरस यांनी निगडी प्राधिकरण येथील महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता चौधरी यांना दिले आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, किवळे आणि विकास नगर परिसरात महावितरणचे अनेक डीपी आहेत त्यातील काही डीपींची दुरवस्था झाली आहे. तर काहींना झाकनेच नाहीत. काही ठिकाणी झाकणे तुटलेल्या अवस्थेत असल्याचे पाहायला मिळते. उघड्या डीपी मुळे उंदीर, मांजर आदि प्राण्यांना विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही डीपी हे रस्त्याच्या मध्ये असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. ते तातडीने रस्त्यालगत सुरक्षितस्थळी हलविण्यात यावेत. असेही ही राजेंद्र तरस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

 

महावितरणच्या डीपी च्या सुरक्षेला प्राधान्य देत लवकरात लवकर दुरुस्ती कामे हाती घेण्यात येतील, यामध्ये ज्या डीपी धोकादायक आहे. त्यांची प्राधान्याने दुरुस्ती केली जाईल. त्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्याचे आश्वासन महावितरणचे कार्यकारी अभियंता चौधरी यांनी दिल्याची माहिती राजेंद्र तरस यांनी दिली आहे.