प्रसिद्ध उद्योजक शिवशंकर लातूरे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातून मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

0
54
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्युज / नाशिक

प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळख असलेले शिवशंकर लातूरे यांनी 9 जानेवारी रोजी 50 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

 

यामध्ये चित्रपट क्षेत्रात निर्माता, लेखक व दिग्दर्शक म्हणून ओळख असलेले सिद्धार्थ ढगे यांनी देखील प्रत्यक्ष वनी, नाशिक येथे जाऊन शुभेच्छा दिल्या. शिवशंकर लातूर यांचे समाजातील विविध क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे. नाशिक वणी येथील तीर्थक्षेत्र असलेल्या सप्तशृंगी गड येथील रोप वे चा पहिला प्रकल्प हा शिवशंकर लातूरे यांनी उभारला आहे. या माध्यमातून भाविकांना दर्शन घेणे सुलभ होणार आहे.