शबनम न्युज / पिंपरी
भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे आणि पूजा ताई लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार, राजेंद्र लांडगे यांच्या सहकार्यानुसार, नवीन बचत गटांचे पिंपरी चिंचवड मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उदघाटन समारंभ सोहळ्याचे आयोजन गटाचे गट प्रमुख सौ मनिषा ताई डोणे यांनी केले होते.
घरकुल सोसायटी मध्ये 3 आळंदी मध्ये 2 बचत गटाचे उदघाटन झाले. त्याप्रसंगी महिलांना बचत गट ते उद्योजका साठी मार्गदर्शन केले गेले.
बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक, औद्योगिक संधी कशा प्रकारे मिळेल याचे मार्गदर्शन सौं नीलमताई हुले आणि मनीषा ताई डोने यांनी केले.
कार्यक्रमांचे आयोजक मनीषा ताई डोने, नीलमताई हुले, सतीश भाऊ जरे आणि बचत गट महिला कार्यकारिणी आणि बचत गटाच्या उत्साही महिला वर्ग यांनी केला होता.