शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील गवळीनगर प्रभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कार्यालयासाठी गवळीनगर सार्वजनिक स्वच्छतागृहात दुरुस्ती करून दोन मजली कार्यालयात रूपांतर करण्याच्या कामास मंजुरी मिळाली असून या प्रभागातील कार्यक्षम नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
१२ जानेवारी २०२१ रोजी आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक घाटे साहेब व पर्यवेक्षिका बनकर मॅडम यांनी लेखी अर्जाद्वारे प्रभाग क्रमांक पाच मधील गवळी नगर मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कार्यालयाची मागणी केली होती.
अनेक जागांचा शोध घेतला असता लक्षात आले की गवळीनगर प्रभागातील सार्वजनिक स्वच्छतागृह जे कोणी वापरत नाही त्याचे आपण कार्यालयामध्ये रूपांतर करू शकतो असे निरीक्षणाअंती दिसून आले .
त्याचा नियमानुसार सर्वे करून त्याचा रिपोर्ट सुद्धा कमिटीने तयार केलेला आहे.
गवळीनगर प्रभागातील कर्मचाऱ्यांना भोसरी गावठाणात रोज ये जा करावी लागे व वेळेचा अपव्यव होत होता.102 स्वच्छता कर्मचारी काम करीत असून त्यात मनपा आरोग्य कर्मचारी ,घंटागाडी ठेकेदार, एम पी एम एच कर्मचारी व संस्था कर्मचारी काम करतात.
या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड ,महिलांसाठी चेंजिंग रूम ,आरोग्य कर्मचाऱ्यांचे साहित्य तसेच जेवण करण्यासाठी जागा कायमस्वरूपी प्रभागात असणे गरजेचे आहे आणि हे सगळे लक्षात घेऊनच नगरसेविका प्रियांका बारसे यांनी या वापरल्या जाणाऱ्या सार्वजनिक स्वच्छता गृहाचे दोन मजली कार्यालयात रूपांतर करण्याचे स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ठरविण्यात आले .
आणि त्यानुसार ई क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीच्या बैठकीत आज या विषयाला मंजुरी मिळाली .
स्वच्छतागृहाच्या भिंतीला धक्का न लावता आतील कप्पे पाडून स्वच्छतागृहांची स्वच्छता कर्मचाऱ्यांची या भागातच सोय होणार आहे.
एक मजल्यावर महिला कर्मचारी तर दुसऱ्या मजल्यावर पुरुष कर्मचारी व व रेकॉर्ड रूम असे नियोजन करण्यात येणार आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये व स्वच्छता विभागाच्या अधिका-यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.