MSCIT व तत्सम कम्प्युटर कोर्सेस भोसरी केंद्रात सुरू करा – नगरसेविका प्रियांका बारसे यांची सभापति, महिला बाल कल्याण समितीकडे मागणी

0
21
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्युज / पिंपरी

MSCIT व तत्सम कम्प्युटर कोर्सेस भोसरी केंद्रात सुरू करा, असे मागणीचे निवेदन नगरसेविका प्रियांका बारसे यांनी सभापति, महिला बाल कल्याण समितीकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्या म्हणतात, नुकतेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण योजना अंतर्गत सर्व जातीधर्माच्या महिला व मुलींसाठी तसेच मागासवर्गीय मुलांसाठी MSCIT व इतर कम्प्युटर कोर्सेस ऍडमिशन सुरू झाले आहे.

 

 

या कोर्सेसचे ऍडमिशन निगडी, आकुर्डी ,चिंचवड या ठिकाणी सुरू झालेले आहे. तशी या विभागाची जाहीरात प्रसिध्दी माध्यमात फीरत आहे.

 

 

तथापि भोसरी विभागाचे नाव आपल्या जाहिरातीत नाही तसेच संपर्क प्रमुखाचे नावही आपल्या यादीत जाहिरातीत नाही .

आमच्या भोसरी विभागात सुद्धा अशा अनेक गरजू महिला, मुली, मागासवर्गीय विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहेत.महिला व विद्यार्थी वर्गातुन भोसरीत ऍडमिशन का सुरू केले नाही याबाबतची विचारणा होत आहे.

 

 

तरी भोसरी विभागात ज्या ठिकाणी आपल्याला हे कम्प्युटर कोर्सेस सुरू करायचे आहे त्या स्थळाचे नाव व संपर्क प्रमुखाचे नाव आपण जाहीर करून प्रवेश सुरु करण्याची मागणी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी माननीय चंदाताई लोखंडे सभापती महिला बालकल्याण विभाग यांच्याकडे केली आहे.

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous articleराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा पुणे जिल्हा दौरा
Next articleचिखली गावातील ईद्रायंणी नदीवर असलेले जलपर्णी काढा दिनेश यादव याची महापौर यांच्या कडे मागणी