शनिवार दि.१६ जानेवारी २०२१ रोजी कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ

0
66
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्युज / पिंपरी

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी शासनानकडून कोविड-१९ लसीकरण दि.१६ जानेवारी २०२१ पासून  सुरू करण्याबाबत सुचना प्राप्त झालेल्या आहेत. सदरची लस आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे आजपर्यंत १७७९२ आरोग्य सेवा देणा-या लाभार्थींची नोंदणी झालेली आहे.

शासनाच्या सुचनेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कोविड -१९ लसीकरणासाठी यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वाय.सी.एम.रुग्णालय, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय व ईएसआयएस रुग्णालय अशी ०८ लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण होणार आहे.

मा.उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ यांचेकडून कोविड-१९ लसीकरणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दि.१३ जानेवारी २०२१ रोजी रात्री २.३० वाजता १५ हजार डोस प्राप्त झालेले आहेत. दि.१६ जानेवारी २०२१ पासून निश्चित केलेल्या ०८ लसीकरण केंद्रावर आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे.

कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ दि.१६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी-१०.३० वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये मा.महापौर,‍ पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे अध्यक्षतेखाली व मा.उपमहापौर, मा.सभापती, स्थायी समिती, मा.सत्तारुढ पक्षनेता, मा. विरोधी पक्षनेता, मा.गटनेता शिवसेना, मनसे, अपक्ष आघाडी, सर्व पदाधिकारी, नगरसदस्य/नगरसदस्या मा.आयुक्त व मा.अतिरिक्त आयुक्त, अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी यांचे उपस्थितीत होणार आहे. अशी माहीती महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.