शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते किशोर भाऊ गाथाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि. ०८) – मावळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार सुनील उर्फ अण्णा शेळके यांच्या हस्ते निगडी येथील राष्ट्रवादीचे किशोरभाऊ गाथाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.
या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी तसेच मावळ युवासेनाप्रमुख अनिकेत घुले ,राजे प्रतिष्ठानचे जितु दादा पवार, तसेच युवा नेते प्रशांत बाराहाते ,त्याचबरोबर शिवसेना देहूरोड शहर प्रमुख धुमाळ ,उपशहरप्रमुख संदीप बाल हारे ,उपशहरप्रमुख रोहित टेकवडे ,युवा नेते पैलवान सावंत यांच्यासह एन एस पाटील साहेब , नाईक साहेब ,विठ्ठल रसाळ, सुरेश येवले, सिद्धू भाऊ गाथाडे, प्रणव भाऊ ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी किशोर भाऊ गाथाडे यांना. त्यांच्या कार्याबद्दल कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शबनम न्यूज प्रतिनिधी.

 

ताज्या बातम्या