Thu. Aug 6th, 2020

संस्कार जत्रा स्पर्धेत एस.बी.पाटील पब्लिक पाटील स्कूलचे वर्चस्व

संस्कार जत्रा २०२०- एस बी पाटील पब्लिक स्कूल,रावेत च्या विद्यार्थ्यांची पारितोषिकाची आतिषबाजी

शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि. १६ जानेवारी २०२०) -पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस.बी.पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘संस्कार जत्रा 2020’ स्पर्धेत नाट्य व समुह गायन विभागात विविध पारितोषिके पटकावून आपले वर्चस्व सिध्द केले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

यामधील नाट्य स्पर्धा विभागात एस.बी.पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व्दितीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांना नाट्यलेखन, दिग्दर्शनासाठी मुख्याध्यपिका बिंदू सैनी, शिक्षिका मंजूषा नाथे यांनी मार्गदर्शन केले. तसेच समूह गायन विभागात इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते नववी या तीनही गटात प्रथम क्रमांक मिळवून एस.बी.पाटील पब्लिक स्कूलच्या विदयार्थ्यांनी या स्पर्धेवर वर्चस्व मिळविले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यपिका बिंदू सैनी, संगीत शिक्षक प्रथमेश इनामदार, सुलोचना पवार, कुलदीप घाडगे यांनी मार्गदर्शन केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, मुख्याध्यपिका बिंदू सैनी यांनी अभिनंदन केले.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!