सामाजिक न्याय मंत्री बडोले यांनी जयस्तंभ परिसराची केली पहाणी
शबनम न्युज : – पुणे, – सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज पेरणे फाटा येथील जयस्तंभ परिसराची पहाणी करुन मानवंदना दिली. त्यांच्यासमवेत समाजकल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक कैलास कणसे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप जाधव, संदीप पखाले, सर्जेराव वाघमारे, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण संजय दाणी, राहूल डंबाळे, विशाल सोनवणे, लताबाई शिरसाट, राजीव सोनकांबळे, संतोष निकाळजे, आरती डोळस, रमेश सावंत, बबन कांबळे आदी उपस्थित होते. सामाजिक न्याय मंत्री श्री. बडोले यांनी प्रारंभी जयस्तंभास मानवंदना दिली. त्यानंतर परिसरात प्रशासनाच्यावतीने करण्यात येणा-या तयारीची पहाणी करुन उपयुक्त सूचना दिल्या. 1 जानेवारीस होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत संपन्न होईल, असा विश्वास व्यक्त करुन सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.