ताथवडे शाळेला मिळाले १२ वर्षानंतर महानगरपालिकेचे पाणी – प्रियांका बारसे, शिक्षण समिती सदस्या

0
25
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्यूज / पिंपरी

जिल्हा परिषद शाळा ताथवडे 2009 ला महानगरपालिका क्षेत्रात आली. तथापि जि.प.व महानगरपालिका क्षेत्र कागदपत्रांमधिल अडथळ्यांमुळे येथे मुलांना पिण्याचे पाण्याची सोय नव्हती .

याबाबतची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शीलाताई पडवळ यांनी निवेदनातून प्रियांका बारसे ,शिक्षण समिती सदस्य यांच्यासमोर व्यथा मांडली.
नगरसेविका प्रियांका बारसे यांनी वरील कामासाठी चक्र वेगाने फिरवुन, सर्वांशी संपर्क साधून याठिकाणी शाळेच्या मुलांना पिण्याचे पाणी नळाद्वारे कसे उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केला.

आज नळकनेक्शन याठिकाणी चालू झालेले आहे .

एका चांगल्या कामात याठिकाणी माझा हातभार लागला याचा मला आनंद होत आहे अशी भावना बारसे यांनी व्यक्त केली तर शाळेच्या मुख्याध्यापिका शीला पडवळ व शिक्षक कर्मचाऱ्यांनी नगरसेविका बारसे यांचा सत्कार करून या कामात खूप मोठे सहकार्य केल्याची भावना व्यक्त केली.

तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या नावात बदल करून मनपा प्राथमिक शाळा असा नावात बदल करण्यासाठी व सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मदत करून महानगरपालिकेच्या सर्व सोयी-सुविधा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना लागू होण्यासाठी मदत करण्याचे प्रियांका बारसे यांनी म्हंटले आहे.

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous articleपिंपरी-चिंचवड मध्ये गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद
Next articleमौलाना आझाद सेवाभावी संस्था गौरव पुरस्काराने सन्मानित