शबनम न्यूज / पिंपरी
गवळीनगर प्रभागातील साई सिद्ध नगर मधील आदर्श शाळेमागील २५ कुटुंब ही गेली १५-१६ वर्ष पाणीटंचाई पासून त्रासलेले होते.
सरत्या वर्षापासुन नगरसेविका प्रियांका बारसे या पाण्याची नवीन लाईन मिळण्यासाठी प्रयत्नशील होत्या.
तूकाई मंदिरापासून नवीन पाण्याची लाईन टाकलीही गेली परंतु पाइपलाईन चढत्या बाजुकडे असल्याने त्यांना पाणीपुरवठा होत नव्हता.
शेवटी स्वतः नगरसेविका प्रियांका बारसे यांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या जागेतुन म्हणजेच आदर्श शाळेच्या जागेमधून पाण्याची नवीन पाईप लाईन टाकून या २५ कुटुंबाची पाण्याची तहान भागवली.
येथिल रहीवासी महिलांनी याचा आनंद साजरा करून नगरसेविका प्रियांका बारसे यांनी केलेल्या या सहकार्याचे मनापासून कौतुक केले. आभार मानले व गेले १५-१६ वर्ष आम्ही जो पाण्याचा त्रास भोगत आहोत या त्रासातून तुम्ही आमची मुक्तता करीत आहात अशी भावना त्यांनी मनोगतातून व्यक्त केली.
आज इंच इंच जागेसाठी लोकांचे मुडदे पडत असताना प्रियंका बारसे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे नगरसेविका प्रियांका बारसे व संपूर्ण बारसे परिवाराचे परिसरातून कौतुक होत आहे.