Thu. Aug 6th, 2020

उदयनराजेंच्या टीकेचा, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला समाचार

शबनम न्यूज : सातारा (दि.१४ जानेवारी २०२०) :- भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. ‘अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो,’ असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं. उदयनराजेंच्या या टीकेचा आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.

‘होय शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न…प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेतच,’ असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

‘महिलांना 30 टक्के आरक्षण, कोकण रेल्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव, जेएनपीटी…असे किती प्रकल्प सांगू…त्यामुळे गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सर्वाधिक योगदान हे शरद पवार यांचंच आहे,’ असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!