नेहरूनगर व बालनगरीमध्ये उभारण्यात येणार्या कोविड-१९ सेंटरची महापौरांनी केली पाहणी
शबनम न्यूज : ०६ ऑग. (प्रतिनिधी) पिंपरी :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून वाढत्या रूग्णांच्या सोयीसाठी पिंपरी येथील
नेहरूनगर मध्ये नव्याने कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू आहे.
पिंपरी येथील नेहरूनगर व बालनगरीमध्ये उभारण्यात येणार्या कोविड-१९ सेंटरची पाहणी आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचेसह केली. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सुहास दिवसे, शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता संजय घुबे आदी उपस्थित होते.