WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

सातारा

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे सन 2019 चे ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर

दिनांक 17 मे रोजी पोंभुर्ले येथे पुरस्कारांचे वितरण शबनम न्यूज :फलटण (दि. १८ जानेवारी २०२०)

पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार – एस. एम. देशमुख

कराडच्या पत्रकारांच्यावतीने सत्कार समारंभ शबनम न्यूज : सातारा (दि.१४ जानेवारी २०२०) :- पत्रकार हल्ला विरोधी

कोरेगाव तालुक्यातील महिलेवर साताऱ्यात बलात्कार

शबनम न्यूज : सातारा (दि.१३ जानेवारी २०२०) :-  मुलासह अपहरण करून कोरेगाव तालुक्यातील महिलेवर साताऱ्यात

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

 सुपरहिट ‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा आगामी ऐतिहासिक चित्रपट  विविध शहरातील चित्रपटगृहांच्या डोअर कीपर्स, व्यवस्थापक,

समाजासाठी कार्य करावे ही आईची शिकवण – युवा उद्योजक पुनीत बालन

 सातारा जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ६०० गरजू विद्यार्थांना सायकल, स्कूल बॅगचे वाटप शबनम न्युज : सातारा (दि. १९ डिसें.) –  माझी आई शिक्षिका होती, “आपण जो एक रुपया कमावतो त्यातून सरकारला कर रूपाने ३० पैसे द्यावे, स्वतःला ४० पैसे ठेवावे आणि उर्वरीत ३० पैसे समाजासाठी खर्च करावे” अशी शिकवण तिने दिली. हीच शिकवण मी विविध उपक्रमातून आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन युवा उद्योजक, इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केले. इंद्राणी बालन फाउंडेशन तर्फे सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील गरजू विद्यार्थांना सायकल आणि स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले याप्रसंगी बालन बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिंदा शहीद या उपाधीने ओळखले जाणारे एम. एस. बिट्टा, माणिकचंद ऑक्सीरिच व आर. एम. धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी आर. धारिवाल, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले उपस्थित होते. तसेच परिवर्तन पुणेचे अध्यक्ष अभिजित घुले, किशोर ढगे, भुजंगराव जाधव, सारंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना बालन म्हणाले, इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने आजपर्यंत अडीच हजाराहून अधिक सायकल, एक हजार संगणक, आठशे स्वयंसिद्धा किटचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक शाळांच्या ग्रंथालयांना पुस्तके देऊन सातारा हा पुस्तकांचा जिल्हा केला आहे. असे कार्य सुरु राहण्यासाठी समाजात अनेक पुनीत बालन निर्माण होण्याची गरज आहे. प्रत्येक पालकाने मुलांना चांगली शिकवण द्यावी, प्रोत्साहन द्यावे कारण आज समाजाला चांगल्या युवकांची, नेतृत्वाची गरज आहे. फाउंडेशनच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाचा फायदा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना होत असल्याचे सांगताना बालन म्हणाले. या मुलांना ३ ते १० कि.मी. प्रवास करावा लागायचा, त्यांना सायकल मिळाल्याने त्यांच्या वेळेची बचत झाली, विद्यार्थी वाचलेला वेळ अभ्यासाला देत असून जी मुले अभ्यासात सर्वसाधारण होती ती आता पहिल्या तीन मध्ये येत आहेत असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

ताज्या बातम्या