Sun. Sep 20th, 2020

ऑक्सिजन, साधे बेड,व्हेंटिलेटर बेड लवकरात लवकर वाढविणे – सचिन चिखले

शबनम न्यूज : ०६ ऑग. (प्रतिनिधी) पिंपरी :-  ऑक्सिजन, साधे बेड,व्हेंटिलेटर बेड लवकरात लवकर वाढविणे असे मागणीचे निवेदन पुन्हा दुसऱ्यांदा मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.

निवेदनात असेही म्हंटले आहे कि, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रोज सरासरी पाचशे ते हजार कोरोणा रुग्ण सापडत आहे, यामध्ये दिवसेंदिवस मृत व्यक्तींचे आकडा वाढत आहे, काही शहरातील रुग्ण ऑक्सीजन बेड व वेंटीलेटर बेड अभावी दगावले आहेत. शहरातील आजची रुग्ण संख्या पाहता ऑक्सीजन बेड व वेंटीलेटर बेड वाढवणे गरजेचे आहे याबाबत आयुक्त व डॉक्टर रॉय सर यांची भेट घेण्यात आली व सविस्तर चर्चा करण्यात आली दहा दिवसांमध्ये ८० ऑक्सीजन बेड उपलब्ध करण्यात येतील ॲटो क्लस्टरला ६० व्हेनटिलेटर वायसीयमला ३० तसेच भोसरीतील बाल नगरी(गवळी माथा) येथे ४२५ खाटा उपलब्ध होणार असुन त्यापैकी ३०० प्राणवायू व १२५ साध्या खाटांचा समावेश आहे. ॲटो क्लस्टर येथे १५० साध्या आणि ६० अतिदक्षता अशा २१० खाटा तसेच आण्णासाहेब मगर मैदान येथे मोठे कोरोना काळजी केंद्र उभारण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात खाटा उपलब्ध होणार असल्याचे मनसेला आश्वासन दिले आहे.

 

 

 

 

मनसेला दिलेले आश्वासन वेळेत पुर्ण केले नाही तर मात्र पिं.चिं.शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या करीता मनसेकडून खळखटयाक करण्यात येईल. असेही हि दिलेल्या निवेदनात सचिन चिखले यांनी म्हंटले आहे.

यावेळी मनसेचे मा.सचिन चिखले(नगर सेवक गटनेता) बाळा दानवले,राजू सावळे,दत्ता देवतरासे उपस्थित होते.

 

 शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा, (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!