शाळा लॉक पण शिक्षण अनलॉक या महानगरपालिकेच्या उपक्रमातुन १००% विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी तातडीची बाब म्हणून इयत्ता पहिली ते आठवी विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी थेट पद्धतीने करावी -नगरसेविका प्रियांका बारसे

0
60
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

पिंपरी / शबनम न्युज

शाळा लॉक पण शिक्षण अनलॉक या महानगरपालिकेच्या उपक्रमातुन १००% विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी तातडीची बाब म्हणून इयत्ता पहिली ते आठवी विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी थेट पद्धतीने करावी,अशी मागणी शिक्षणसमिती सदस्या-नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आयुक्तांकडे केली आहे. 

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्या म्हणतात,आपल्या मनपा शाळेत सर्वसामान्य व स्लम एरियातील विद्यार्थी शिक्षण घेतात.आज अंदाजे 70% विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणप्रवाहात तर 30% विद्यार्थी शिक्षणप्रवाहा बाहेर आहेत.
कोरोना कालावधी लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सर्वांनाच शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी व ऑनलाईन शिक्षणासाठी टॅबची अत्यंत गरज लक्षात घेऊन आपण या विषयाकडे गांभीर्याने पहावे.

मागील आर्थिक वर्षात 23/ 12 /2019 व दिनांक 4 /1 /2020 अन्वये टॅब खरेदी संदर्भाचा विषय आपल्याकडे शिक्षण समितीमार्फत मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी आपणाकडे पाठविला होता. तथापि 2020-21 हे शैक्षणिक वर्ष संपत आले असून आजही टॅब खरेदीकडे आपण लक्ष दिलेले नाही.

अजूनही पुढील सहा महिने प्राथमिक वर्ग सुरू होण्याची शक्यता कमी आहे.

पालकवर्ग कामानिमित्ताने घराबाहेर असतात.मोबाईल पालकांकडे असतात.त्यामुळे ऑनलाईन शिक्षणास मर्यादा येतात.शिवाय प्रत्येकाकडे स्मार्टफोन असेलच असे नाही.

तरी शिक्षणासारख्या गंभीर विषयाकडे तुम्ही या पुढच्या काळात लक्ष द्याल अशी अपेक्षा करते.
ऑनलाईन शिक्षणाला चालना मिळण्यासाठी इयत्तावार व विषयवार अभ्यास डाऊनलोड करून आज प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात टॅब असणे अत्यंत गरजेचे आहे .

शाळा लॉक पण शिक्षण अनलॉक या महानगरपालिकेच्या उपक्रमातुन १००% विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तातडीची बाब म्हणून थेट पद्धतीने खरेदी होण्यासाठी आपण परवानगी द्यावी ,अशी मागणी प्रियांका बारसे यांनी केली.

यावर आयुक्तांनी सकारात्मकता दाखविली असुन लवकरच शिक्षण समिती सभापती,सदस्य व प्रशासन अधिकारी,शिक्षणमंडळ यांचे बरोबर एक मिटींग घेऊन शिक्षणाबाबतचे सर्व विषयांवर योग्य निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले आहे.

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous articleभविष्यातील आरोग्य व्यवस्थापनात आयुर्वेदाला महत्वाचे स्थान : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
Next article#PIMPRI : ‘औषधी उद्यान’ वाचवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा ‘लढा’