गवळीनगरमधील गुळवे मैदानातील पाण्याच्या टाकी बांधण्याचे काम प्रगतीपथावर -नगरसेविका प्रियांका बारसे यांची नुकतीच केली कामाची पाहणी.

0
54
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्यूज /पिंपरी चिंचवड

आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले गवळीनगर प्रभागातील गुळवे मैदान येथील सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम प्रगतीपथावर असल्याचे दिसुन आले .
नुकतीच नगरसेविका प्रियांका बारसे यांनी या कामाला भेट दिली असता तेथे सुरक्षा रक्षक नसल्याचे त्यांना आढळून आले .अभियंते लाडेसर, ठेकेदार साळुंखे यांना याठिकाणी बोलवुन अभियंत्यांना ही जागा पूर्णपणे ठेकेदाराच्या ताब्यात देण्यास सांगून याठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची सूचना बारसे यांनी दिल्या .
लहान मुले,महिला यांना विनाकारण आत मध्ये येऊन बसण्याच्या आणि मुलांना खेळण्याच्या गोष्टीस प्रतिबंध घालण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या व काही झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी तुमच्यावर राहील असे त्यांनी ठणकावून सांगितले.

टाकीचे बांधकाम नुकतेच सुरु झाले असून येत्या दोन वर्षात टाकीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
20 लाख लिटर पाण्याची क्षमता असलेली टाकी प्रभाग क्रमांक पाच साठी जीवनदायिनी म्हणजेच वरदहस्त आशीर्वादच ठरणार आहे .कारण कमी प्रेशर व पुरेसा साठा नागरिकांना मिळत नाही .त्यात प्रभागातील लोकसंख्या वाढलेली असल्याने येथे पाणी कमी पडते त्या दृष्टिकोनातून प्रभाग क्रमांक पाच मधील ही पाण्याची टाकी लोकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

या चांगल्या कामात हातभार लागत असल्याचे समाधान विद्यमान नगरसेविका प्रियांका बारसे यांनी व्यक्त केले

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous articleTALEGAON NEWS : रूडसेट संस्था ,तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत महिलांसाठी मोफत प्रशिक्षण