नगरसेविका सौ प्रियांका बारसे यांच्या माध्यमातून गवळीनगर प्रभागातील कामांना वेग

0
33
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

पिंपरी / शबनम न्युज

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आपल्या प्रभागातील विकास कामांना वेग देत आपल्या प्रभागातील विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू केले असून, नागरिकांचे सर्व अडचणी सोडविण्यासाठी प्रभागातील विकासकामांचा वेग वाढविला आहे.

सन २०२०-२१ चा कठीण असा कोरोना कालावधी ,दिवाळीचा काळ त्यानंतर पदवीधर शिक्षक निवडणूक आचारसंहीता या सर्व गोष्टींमुळे प्रभागात नविन कामांना सुरुवात करण्यास उशीर झालेला आहे.

पण आज प्रभागातील स्थापत्य विभागाचे अभियंते पांचाळ सर,सुपरवायझर गायकवाड यांना बरोबर घेऊन प्रभागातील स्थापत्य विभागाची कोणकोणती कामे करावयाची आहेत याबद्दल एक स्पॉट व्हिजिट पाहणी प्रभागात करण्यात आली .
तस पाहिल तर निवडून आल्यापासून प्रियांका बारसे यांनी कामात कुठेच कसूर ठेवलेली नाही.

नागरिकांच्या दारापुढील कामांना म्हणजेच रस्ता ,लाईट, ड्रेनेज, पाणी,कचरा या कामांना त्यांनी जास्त महत्त्व दिलेले आहे .
आजही हेच मुद्दे लक्षात घेऊन स्थापत्य अभियंते पांचाळ जलनिस्सारण विभागाचे अभियंते कुतवळ पाणी पुरवठा अधिकारी लाडे व शैलेश, स्वच्छता विभागाचे घाटे सर स्ट्रीट लाईट संदर्भात कोण व पाचरणे यांच्याशी सतत संपर्कात राहून प्रभागात कोणाला अडचण तर नाही ना यासाठी त्या नेहमीच जागृत राहिलेल्या आहेत.
त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात कोणी तक्रार केली आणि आठ दिवसाच्या आत या तक्रारीचे निवारण झाले नाही असे या चार वर्षात कधीच झालेले नाही.
राजकारणाच्या माध्यमातून त्यांना समाजात काम करण्याची संधी मिळालेली असली तरी राजकारणातून समाजकारण करण्याचा धडा घ्यावा तो फक्त प्रियांका बारसे यांच्याकडूनच.
यापुढच्या काळातही नागरिकांच्या या बेसिक गरजांना महत्त्व देऊनच त्यांचे काम प्रभागात अधिक गतीने करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous articleमहापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार सोहळा संपन्न
Next articleभाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत सुरेश चोंधे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त “विकास अनाथ आश्रम” या ठिकाणी अन्नदान