#PIMPRI : पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अभ्यासिका परिक्षेसाठी सुरु कराव्या – सचिन चिखले

0
80
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

पिंपरी / शबनम न्युज

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अभ्यासिका परिक्षेसाठी सुरु कराव्या असे मागणीचे निवेदन नगरसेवक सचिन चिखले यांनी मनपा उपायुक्त अजित पवार यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पुढील काळात होणार्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तसेच सरळ सेवा भरती स्पर्धा परिक्षा होणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्याना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका सुरु करण्यात याव्यात यासाठी माझ्याकडे अनेक विद्यार्थी विनंती अर्ज करत आहेत. अभ्यसिका बंद असल्यामुळे विद्यार्थ्याना अभ्यास करण्यासाठी त्रास होत आहे त्यामुळे मी विद्यार्थ्यांच्या वतीने आपणास अर्ज करतो की अभ्यासिका लवकरात लवकर सुरु कराव्यात. असे ही सचिन चिखले यांनी मनपा उपायुक्त अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous article#PUNE : इच्छुक बेरोजगार युवक युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा
Next articleशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन