पिंपरी चिंचवड मधील तिन्ही आमदारांसह मावळच्या आमदारांना मिळाले समिती सदस्य पद

0
229
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

पिंपरी चिंचवड / शबनम न्यूज

कोरोना आजाराच्या प्रादुर्भावाचा फटका विधीमंडळ समित्यांनाही बसला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या विधिमंडळ समित्या वर्षभरानंतर नुकत्याच (ता. 5 नोव्हेंबर) स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडमधील तीन आमदारांपैकी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना दोन समितीचे सदस्यत्व मिळाले आहे. शहरातील भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांची प्रत्येकी एका समितीवर सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. मावळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना दोन समिती वर सदस्य पद मिळाले आहे

 

आमदार बनसोडे यांना सर्वाधिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीचे सदस्यत्व देण्यात आले आहे.

अण्णा बनसोडे यांना ग्रंथालय समितीवरही घेण्यात आले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांना उपविधान समिती, तर आमदार महेश लांडगे यांना सार्वजनिक उपक्रम समिती देण्यात आली आहे. मावळमधून प्रथमच निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार सुनील ऊर्फ अण्णा शेळके यांना दोन समित्या मिळाल्या आहेत. एडस रोगाला प्रभावी प्रतिबंध घालण्यासाठीच्या फोरम तथा समितीसह विशेषाधिकार समितीवरही त्यांना घेण्यात आले आहे.

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous articleकुदळवाडीच्या भारतमाता सोसायटीच्या ड्रेनेज लाईनचे काम सुरू – मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांच्या पाठपुराव्याला यश