शहरातील दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी इत्यादी घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेमणूक केलेल्या समीर घोष यांच्या कामाचा अहवाल द्यावा – नाना काटे
शबनम न्यूज २० मे ( पिंपरी चिंचवड ) – शहरातील दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी इत्यादी घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेमणूक केलेल्या समीर घोष यांच्या काम चा अहवाल द्यावाअशी मागणी राष्ट्रवादी चे विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागा अंतर्गंत राबविण्यात येणा-या दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गंत शहरातील दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी इत्यादी घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनेनुसार व न्यायालयीन आदेशानुसार या घटकांतील नागरीकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व समावेशक कृती आराखडा करण्यासाठी सल्लागार म्हणून समीर घोष यांची एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यानंतर माहे १८/०४/२०२० च्या मा. स्थायी समिती ठराव क्र. ७०१९ अन्वये दोन वर्ष त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रतिदिन र.रु. १६,५०० या दराने महिन्यातील १० दिवसांचे कामकाजाकरीता र.रु. १,६५,०००/- इतके मानधन निश्चित करुन मान्यता देण्यात आलेली आहे. असे असताना समीर घोष हे अकार्यक्ष पणे काम करीत आहे
पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी व्यक्ती इत्यादी घटक मुख्य प्रवाहात आणून त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम केले पाहिजे यात काही दुमत नाही परंतु समीर घोष मागील एक वर्षापासून सल्लागार काम करीत असून त्यांनी दिव्यांग व्यक्तीसाठी, तृतीयपंथीसाठी भरीव असा कृती आराखडा तयार केल्याचे दिसून येत नाही. उलट त्यांच्या नियत्रंणाखाली काम करणा-या कर्मचा-यांनी त्यांच्या कार्यपध्दतीला कटांळून राजीनामा दिल्याचे समजते.
, या सल्लागारांनी पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग व्यक्ती व तृतीयपंथी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणत्या कृती आराखडा तयार केला व त्यानुसार काय काम केले, शहरात कोणते उपक्रम राबविले याचा सविस्तर अहवाल देण्यात यावा. अशी मागणी नाना काटे यांनी केली केली आहे