Tue. Jun 9th, 2020

#PUNE : पुणे विभागातील3 हजार 841 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

शबनम न्युज : पुणे (दि. २७ मे ) – पुणे विभागातील 3 हजार 841 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 8 हजार 122 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 904 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 200 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

यापैकी पुणे जिल्हयातील 6 हजार 604 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 3 हजार 355 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 954 आहे. कोरोनाबाधित एकूण 295 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 193 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 403 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 301, सातारा जिल्ह्यात 59, सोलापूर जिल्ह्यात 32, सांगली जिल्ह्यात 6, कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 394 कोरोना बाधीत रुग्ण असून 122 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 653 कोरोना बाधीत रुग्ण असून 297 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 292 आहे. कोरोना बाधित एकूण 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 88 रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 39 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 383 कोरोना बाधीत रुग्ण असून 20 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 360 आहे. कोरोना बाधित एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 77 हजार 117 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 72 हजार 747 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 370 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 64 हजार 516 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 8 हजार 122 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

 

#PUNE : पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचापुरेसा पुरवठा

#PUNE : पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरीत मजुरांकरीता निवारा व भोजनाची सोय

#PIMPRI : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे

#BREKING : धक्कादायक ! चिंचवड मधील एटीएम मशीन ची चोरी

#MANSUN : पुणे, बारामती येथे १० जून आणि मुंबईला ११ जून रोजी मान्सूनचे आगमन

#MAVAL : ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा मोठा फटका, महाराष्ट्राला आर्थिक मदत करा’- खासदार श्रीरंग बारणे

ताज्या बातम्या

#PUNE : पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचापुरेसा पुरवठा

#PUNE : पुणे विभागात प्रशासनाकडून स्थलांतरीत मजुरांकरीता निवारा व भोजनाची सोय

#PIMPRI : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत : आमदार महेश लांडगे

#BREKING : धक्कादायक ! चिंचवड मधील एटीएम मशीन ची चोरी

#MANSUN : पुणे, बारामती येथे १० जून आणि मुंबईला ११ जून रोजी मान्सूनचे आगमन