Fri. Jun 5th, 2020

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध कामांसाठी येणार्‍या र.रु. ८ कोटी ६० लाख इतक्या खर्चास मंजूरी

शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि. २७ मे) – महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी टेस्टिंग बस वापरण्यास मान्यता देण्यात आली असून बसमध्ये रक्त नमुने घेणे, स्क्रिनिंग करणे इत्यादी सुविधा असून त्याचा उपयोग रुग्णांचा जादा प्रादुर्भाव असणारे क्षेत्रात रुग्ण ,स्व्याब नमुने घेणे यासह तातडीने तपासणी करणे सोयिस्कर होणार आहे. त्यासाठी येणार्‍या १ कोटी रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. त्यासह विविध कामांसाठी येणार्‍या र.रु. ८ कोटी ६० लाख इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली. आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून भोसरी रुग्णालय येथे १० बेडचे वायसीएम येथे १५ बेडचे आयसीयू यूनिट तातडीने तयार करणेकामी व त्यासाही आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी येणार्‍या १ कोटी ७१ लाख इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली. ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कासारवाडी उपविभागातील नव्याने विकसित होणार्‍या रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय व अनुषंगिक कामे करण्यासाठी येणार्‍या २६ लाख रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून आपत्कालीन परिस्थितीसाठी उपाययोजना म्हणून रुबी अलकेयर सर्व्हिसेस प्रा.लि. यांचेकडून त्यांच्या सर्व डॉक्टर्स व स्टाफ सह सेवा
वापरणेसाठी प्रतिमहा र.रु. ५२ लाख ६२ हजार रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. पीएमपीएमएलचे निगडी येथील बस डेपो येथील चार्जिंग पॉइंट व इतर अनुषंगिक कामासाठी येणार्‍या २६ लाख ७८ हजार इतक्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली.

#PUNE : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या संकल्पनेतून पुणे विभागात डॅश बोर्ड विकसित

#PUNE : निसर्ग चक्रीवादळात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मदतीचा धनादेश

PIMPRI : स्व. भिकू वाघेरे पाटील यांच्या 35 व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

#PUNE : कोरोनाचा रुग्णदर व मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा

#SONU SUD : काही लोकं करत आहेत माझ्या नावाने गरजूंची फसवणूक – अभिनेता सोनू सूद

#CRIME : १८ लाखांचा गंडा ; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या