Sun. Jun 7th, 2020

शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी आपले शहर कोरोनामुक्त कसे होईल? याकडे अधिक लक्ष देण्याची गरज – नगरसेवक शैलेश मोरे

शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि. २७ मे) – कोरोनाने राज्यासह संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात थैमान घातलेले असताना, निगडी-प्राधिकरणातील स्थानिक नगरसेवकांनी केवळ झोपडपट्टीतील अडाणी, अशिक्षित नागरिक म्हणून आनंदनगरच्या नागरिकांना प्राधिकरणात क्वारंटाईन करण्यास विरोध करीत त्यांची अवहेलना केली आहे. हे अत्यंत चुकीचे असून, माणुसकीला धरून नाही, अशा कडक शब्दात प्रभाग १९ चे नगरसेवक शैलेश मोरे यांनी आपली जाहीर नाराजगी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.

 

 

 

 

 

 

त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील आनंदनगरच्या कोरोना संशयितांना निगडी-प्राधिकरणातील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या महाविद्यालयात क्वारंटाईनसाठी आणू नये, त्यांना त्याच परिसरात क्वारंटाईन करावे. आमच्या ग्रीनझोनमध्ये तेथील नागरिकांना क्वारंटाईन करु नये, अशी भूमिका प्रभाग १५ निगडी प्राधिकरणातील स्थानिक नगरसेवकांनी घेतलेली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून प्रत्यक्ष रस्यावर उतरून हा विरोध सुरू होता. त्यामुळे पोलिसांनी नगरसेवकांना (दि. २६) ताब्यात घेतले आहे.

शहरातील सर्वच भागात कोरोना संशयीतांसाठी महापालिकेने क्वारंटाईन केंद्र तयार केली आहेत. संशयीतांना क्वारंटाईन करण्यास तेथील नागरिकांनी कोणतीही हरकत घेतलेली नसताना, प्राधिकरणातील सुशिक्षित नगरसेवक व नागरिकांकडून अशी अपेक्षा मुळीच नव्हती. माणुसकीच्या नात्याने प्राधिकरण वासियांनी आनंदनगरच्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यास महापालिकेला मदत करावी. कोरोना उच्च-नीच काहीच पाहत नाही. उद्या जर हीच वेळ प्राधिकरणातील नागरिकांवर आली तर, आम्हीही तुम्हाला विरोध करायचा? स्थानिक नगरसेवकांनी व नागरिकांनी यावर समोपचाराने तोडगा काढावा. सर्वच ठिकाणच्या नगरसेवकांनी व नागरिकांनी विरोध करायचे ठरवले तर, शहराचे वाटोळे होईल. विरोधाने विरोधच वाढतो. शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी आपले शहर कोरोनामुक्त कसे होईल? याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे या पत्रकात नगरसेवक मोरे यांनी म्हटले आहे.

 

शिवराज्याभिषेक निमित्त नगरसेवक उत्तम केंदळे वतीने रक्तदान शिबीर संपन्न

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भांबर्डे गावाची मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी

पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

भिकू वाघेरे प्रतिष्ठानकडून “मुख्यमंत्री सहाय्यता निधीस” उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एक लाखाचा धनादेश सुपूर्द

कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा

ताज्या बातम्या

शिवराज्याभिषेक निमित्त नगरसेवक उत्तम केंदळे वतीने रक्तदान शिबीर संपन्न

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भांबर्डे गावाची मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी

पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

भिकू वाघेरे प्रतिष्ठानकडून “मुख्यमंत्री सहाय्यता निधीस” उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एक लाखाचा धनादेश सुपूर्द