मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बहुचर्चित कृषिक 2020 चे उद्घाटन
शबनम न्यूज : बारामती (दि. १६ जानेवारी २०२०) – मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा बारामतीचा पहिलाच दौरा आहे. अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या बहुचर्चित कृषिक 2020 चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले.
यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ,उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, कृषीराज्यमंत्री विश्वजित कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रीक कारमधून येथील प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी या गाडीचे सारथ्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हा मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलाच बारामती दौरा असल्याने सर्वांचे ते काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.
कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबवित असलेले आधुनिक तंत्रज्ञान, शेती व शेतीपूरक व्यवसायाची निगडित सर्व विषयावरची माहिती उपस्थित मान्यवरांना अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटकनाशके, कृषी अवजारे व यंत्रे, प्रक्रिया उद्योग, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस तंत्रज्ञानातील कंपन्या सहभागी झालेल्या आहेत. मराठवाड्यातील दुष्काळ, अतिवृष्ठीशी बळिराजा जिद्दीने लढतो आहे. या लढाईत साथ देण्यासाठी कृषिक २०२० कडून बारामतीत भरविल्या जात असलेल्या कृषी प्रदर्शनाचे हे पाचवे वर्षे आहे. १९ जानेवारीपर्यंच चालणाऱ्या या प्रदर्शनाला पहिल्याच दिवळी उदंड प्रतिसाद मिळाला.