Thu. Aug 6th, 2020

डीआरआयच्या पथकाने छापा टाकून जप्त केल्या १८ लाखांच्या बनावट नोटा

शबनम न्यूज : नागपूर (दि. १६ जानेवारी २०२०) – महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने मोठा ताजबाग परिसरात छापा टाकून १८ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या. याप्रकरणात लालू नावाच्या एका युवकाला अटक करण्यात आली आहे. डीआरआय त्याच्या तीन साथीदारांचा शोध घेत आहे. मोठा ताजबाग परिसरात लालू हा पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली.

डीआरआयच्या पथकाने छापा टाकून लालू याच्याकडून १३ लाख ८९ हजार रुपयांच्या पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तपासादरम्यान डीआरआयच्या पथकाने आणखी एका युवकाकडून चार लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!