Thu. Aug 6th, 2020

शहर कॉंग्रेसच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात निषेध आंदोलन

महाराजांशी तुलना म्हणजे सुर्याशी तुलना केल्यासारखे- सचिन साठे

महागाई बेरोजगारीकडे दुर्लक्ष होण्यासाठी भाजपा व आरएसएसचा कुटील डाव- विष्णुपंत नेवाळे

शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१४ जानेवारी २०२०) :- खरा इतिहास दडपून कपोलकल्पित, काल्पनिक इतिहास नवीन पिढीवर लादण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व इतर थोर राष्ट्रपुरुषांच्या नावांचा वापर भाजपा व आरएसएस करीत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाजपाच्या व आरएसएसच्या विचारांच्या एकाही व्यक्तींचे काहीही योगदान नाही. त्यांच्या विचारांचे कोणीही राष्ट्रपुरुष स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. हा इतिहास दुर्लक्षित व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या व थोर राष्ट्रपुरुषांच्या नावांचा वापर स्व:ताची प्रतिमा उंचावण्यासाठी करीत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे. हे भाजपा व आरएसएसचे धोरण आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर भाजपावाले कायम टिका करतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांवर टिका करु शकत नाही म्हणून महाराजांबरोबर स्व:ताचे नाव जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. महाराजांच्या नावाबरोबर तुलना करणे म्हणजे सुर्याबरोबर तुलना केल्यासारखे आहे. पुस्तकाचे लेखक गोयल आणि प्रकाशक यांचा शहर कॉंग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करीत असल्याचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी तुलना करणारे नरेंद्र मोदी यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने व कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या लेखकाचा व प्रकाशकाचा निषेध करण्यासाठी शहर कॉंग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 14) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, बिंदू तिवारी, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती व भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सोशल मिडिया शहराध्यक्ष चंद्रशेखर जाधव, एनएसयुआय शहराध्यक्ष वसिम इनामदार, दिलीप पांढरकर, तानाजी काटे, लक्ष्मण रूपनर, भाऊसाहेब मुगूटमल, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, मेहताब इनामदार, हिरामण खवळे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, संदेश बोर्डे, किशोर कळसकर, हिरामण खवळे, विश्वनाथ खंडाळे, दिपक जाधव, वैभव शिंदे, दिनकर भालेकर, वैभव किर्वे, माधव पुरी, बी.आर. वाघमारे, मोहन अडसुळ आदी उपस्थित होते.
यावेळी विष्णूपंत नेवाळे म्हणाले की, मागील पाच वर्षाच्या काळात केंद्रातील मोदी सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. चुकीच्या पध्दतीने लादलेल्या जीएसटी व नोटाबंदीमुळे प्रचंड महागाई वाढली असून बेरोजगारी वाढली आहे. या विषयांकडे सामान्य जनतेचे लक्ष जाऊ नये, म्हणून अशा पध्दतीने कायम वाद निर्माण करणे व चुकीचा इतिहास सादर करणे. हा भाजपा व आरएसएसचा कुटील डाव आहे. हे पुस्तक ताबडतोब मागे घ्यावे व लेखक प्रकाशकांनी जनतेची जाहिर माफी मागावी. अन्यथा हे आंदोलन अजून तीव्र करु असा इशारा नेवाळे यांनी यावेळी दिला.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!