दिल्लीच्या शाळांच्या धर्तीवर महापालिका शाळांचा विकास होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
शबनम न्यूज : मुंबई (दि.१४ जानेवारी २०२०) :- शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी दिल्लीमधील सरकारी शाळांच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थळांचा विकास करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली तसेच सर्वसामान्य च्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्नशील राहिले पाहिजे शिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही परंतु शासकीय निधीचा अपव्यय रोखला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीच्या शाळांचा दर्जा सध्या देशामध्ये नावाचं जात आहे या शाळांच्या धर्तीवर मुंबईसह पाच महानगरपालिकांच्या शाळांचा विकास करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.