WeCreativez WhatsApp Support
शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
मी आपली काय मदत करू शकतो ?

स्व. चंद्रकांत छाजेड फौंडेशन आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप

शबनम न्यूज : पुणे (दि.१४ जानेवारी २०२०) :- खडकी येथील स्व. चंद्रकांत छाजेड फौंडेशन आणि टिकाराम जगन्नाथ  महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

मानव मिलन महिला विभाग आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या वतीने  स्व. चंद्रकांत छाजेड यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले  होते. या रक्तदान शिबिरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिराला नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याहस्ते चष्मे वाटप करण्यात आले .  आणि यानिमित्ताने उपस्थित रक्तदात्यांशी संवाद साधला. एक व्यक्ती म्हणून स्व. चंद्रकांत छाजेड यांचे काम खूप मोठे होते आणि त्यांचे कुटुंबीयसुद्धा त्यांचा हा समाजसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. अशाच पद्धतीने चांगले काम करणाऱ्या खडकी शिक्षण संस्थेलाही आपण लागेल ती मदत वेळोवेळी देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  कृष्णकुमार गोयल यांनी संस्थेचे माजी सचिव स्व. चंद्रकांत छाजेड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला . स्व. चंद्रकांत छाजेड यांनी गोर-गरिबांसाठी सुरु केलेल्या शैक्षणिक चळवळीला पुढे नेण्याचे काम आता आपण करत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. छाजेड कुटुंबियांचे काम मोठे आहे असेही ते म्हणाले. रक्तदानासारखे पवित्र कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि ते रुजवणे अशी मोठी जबाबदारी प्राध्यापक पार पाडत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. संचालक मंडळ सदस्य श्री. ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी सूत्रसंचालन केले.

खडकी शिक्षण संस्थेचे चिटणीस आणि चंद्रकांत छाजेड फौंडेशनचे प्रमुख आनंद छाजेड, मानव मिलन महिला विभाग प्रमुख  निर्मला छाजेड,  अर्चना लुणावत यांनी रक्तदात्यांशी संवाद साधला.  संस्थचे हितचिंतक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व छाजेड कुटुंबीय आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. सलग तिसऱ्या वर्षी जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले.

यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे सहसचिव शिरीष नाईकरे,  दादा कचरे,  रमेश अवस्थे, महादेव नाईक, कमलेश चासकर, माजी महापौर  दत्ता गायकवाड,  उत्तम बहिरट,अनिल भिसे,  टोणपे, डॉ. अर्जुन मुसमाडे, प्रा. जुगल नाईक, प्रा. तानाजी गायकवाड आदी उपस्थित होते.

सचिन सोनिग्रा हेही त्यांच्या इनोव्हेशन सोल्युशन्स संस्थेच्या कर्मचाऱ्यांसह सह रक्तदानात सहभागी झाले होते. प्रा. अविनाश कोल्हे, प्रा. श्रीपाद ढेकणे, प्रा. पी. आर. होले, प्रा. शैलेश सोनार, प्रा. संजय काटे, प्रा. शरद बोटेकर आणि  गणेश जाधव, अमर गवळी यांनी स्वतः रक्तदान करीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

जनकल्याण रक्तपेढीच्या डॉ. तन्वी यार्दी यांनी वैद्यकीय सहाय उपलब्ध करून दिले. प्राचार्य डॉ. एम. यू. मुलाणी,  IQAC समन्वयक प्रा. राजेंद्र लेले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.  भैरप्पा बिरादार,  आनंद नाईक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुचेता दळवी व अन्य प्राध्यापक यावेळी उपस्थित होते

औंध रोड येथील बाबुराव शेवाळे हॉस्पिटल  येथे .मोफत आरोग्यशिबिर, नेत्रतपासणी शिबिर, चष्मेवाटप आदी उपक्रम घेण्यात आले. यात ५६० नागरिकांनी सहभाग घेतला. यातील ४६० जणांना मोफत चष्मे देण्यात आले. मोतीबिंदू असणार्यांना अग्रवाल हास्पिटल येथे पुढील उपचारासाठी बोलवण्यात आले. यासाठी संकेत कांबळे, राहुल मराठे, नशिकेत कांबळे, संतोष केंगार, तसेच अग्रवाल हॉस्पिटलचे  डॉक्टर व सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

ताज्या बातम्या