Thu. Aug 6th, 2020

महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख व तुलना करणाऱ्यांचा भवानी ब्लॉक काँग्रेस वतीने जाहीर निषेध

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख व तुलना करणाऱ्यांचा भवानी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने जाहीर निषेध आंदोलन

शबनम न्यूज : पुणे (दि.१४ जानेवारी २०२०) :- छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख व तुलना करणाऱ्यांचा भवानी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने नाना पेठमधील संत कबीर चौकात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आला . या निषेध आंदोलनाचे संयोजन  भवानी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील घाडगे यांनी केले होते . यावेळी नगरसेवक अविनाश बागवे , नगरसेविका लता राजगुरू , नगरसेविका चाँदबी नदाफ , माजी नगरसेवक वीरेंद्र किराड , भगवान धुमाळ , मेहबूब नदाफ , अरुण गायकवाड ,   राजेश शिंदे , प्रभाग अध्यक्ष  सुनील भावकर , वॉर्ड अध्यक्ष हुसेन शेख , अँथोनी वाकडे , शाम गायकवाड , बाबुलाल पंचरस , शिवाजी पाटील , रोहित अवचिते , मीरा शिंदे , सुरेखा घाडगे ,नितीन खुंटे , सीता तुपे , उषा गाडे , दीपाली कांबळे , संपत डाडर , विपुल मोहिते , , सोहन घाडगे , बाळू गाडे , प्रेम तुपे , बाबा भिंगारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते .

यावेळी नगरसेवक अविनाश बागवे ,नगरसेविका लता राजगुरू , माजी नगरसेवक वीरेंद्र किराड व निषेध आंदोलनाचे संयोजन  भवानी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील घाडगे यांनी निषेधात्मक भाषणे केली .

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!