#PIMPRI : परखड भूमिकेमुळे मनसेला युवा वर्गाची मिळते अधिक पसंती – सचिन चिखले

0
55
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
  • १५ व्या वर्धापनदिनी शहर मनसेचे ‘इंजिन’ सुसाट..
  • पक्ष बांधणी व सभासद नोंदणीवर शहरप्रमुखांचा जोर

शबनम न्यूज / पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मनसे पदाधिकारी तयारीला लागले आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका आणि पक्षप्रवेशावर जोर दिला जात आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय साठमारीत मनसेची घोडदौड चांगलीच वेगाने सुरू आहे. विशेषतः युवा वर्गाचा मनसेकडे ओघ सुरू असून तिन्ही मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांनी गेल्या दोन महिन्यात पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत मनसेला नक्कीच चांगले दिवस येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

आगामी महापालिका निवडणूक अवघी दहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. पालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात सत्तासंघर्ष सुरू असून पदवाटपावरून आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांना अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्र निवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षबांधणीवर भर दिला आहे. सुरूवातीच्या काळात पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये पक्षाची बांधणी केली. त्यानंतर नवीन कार्यकर्त्यांचा प्रवेश घेण्यात आला. चिंचवड मतदार संघात देखील पक्षाने जोरदार तयारी केली. अनेकांचे प्रवेश करून घेण्यात आले. भोसरी विधानसभा मतदार संघात देखील जुन्या विभाग आणि प्रभाग अध्यक्षकांनी इच्छुकांचे प्रवेश करवून घेतले. च-होली, मोशी, डुडूळगाव, भोसरी भागातील असंख्य युवकांनी मनसेला जवळ केले आहे. त्यामुळे तिन्ही मतदार संघामध्ये मनसेची ताकद वाढताना दिसत आहे.

पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांना पक्षवाढीसंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यानुसार त्यांनी स्थानिक कोअर कमिटीत सर्वानुमते निर्णय घेवून प्रत्येक पदाधिका-यांवर पक्षावाढीची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे सर्वच पदाधिकारी कामाला लागले आहेत. आपापल्या भागात पक्षाची ध्येयधोरणे प्रत्येकाच्या मनामध्ये रुजविण्याचे काम दिले आहे. मनसेचं हिंदुत्व घराघरात पोहोचलं पाहिजे, याचा आढावा घेण्यासाठी परवा राज्याचे उपाध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवडचे प्रभारी रंजित शिरोळे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रभागनुसार कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. प्रभाग क्रमांक १६, १७, १८, २२, २४, २९, ३१, ३२ मध्ये प्रभाग अध्यक्षांच्यासोबत बैठका घेऊन कामाचा आढावा घेतला. तसेच, त्यांना मनसेचे हिंदुत्व नागरिकांना पटवून देण्यासंदर्भात सूचना देखील केल्या.

पदाधिका-यांच्या सक्रीय सहभागामुळे मनसेच्या पदाधिका-यांना उर्जा मिळाली आहे. ते जीव ओतून कामाला लागले आहेत. याशिवाय, स्वाक्षरी मोहीम, महापालिकेतील आंदोलन, केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधातील आंदोलनातून मनसेने आपली भूमिका वेळीच निभावली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कामाच्या विरोधात देखील गटनेते सचिन चिखले यांनी वेळोवेळी अत्यंत परखड भूमिका घेतली आहे. महापालिका सभागृहात देखील त्यांनी सत्ताधा-यांचे वाभाडे काढायला कधी कसर केली नाही. त्यामुळे मनसेची शहरात वेगळीच क्रेज आहे. त्यांच्या धाडसी भूमिकेमुळे युवावर्गाला मनसेची भूरळ पडत आहे. आगामी पालिका निवडणुकीत मनसे नक्कीच जादू करून दाखवेल, असा अंदाज सध्याच्या स्थितीवरून व्यक्त केला जात आहे.

‘मनसे पक्षाचा १५ वा वर्धापन दिन कोरोना संकटमुळे पक्षाला साजरा करता आला नाही. दरवर्षी प्रमाणे या वर्षी पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त होणार मेळावा आणि त्यात होणार राज ठाकरे यांचे मार्गदर्शन यावर्षी होऊ शकले नाही. यामुळे आजच्या या दिनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शुभेच्छा आणि मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे यांनी डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर करत एक ॲाडिओ मॅसेज पक्षाच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवला. या ॲाडिओ मॅसेज मध्ये राज ठाकरे यांनी येणाऱ्या काळात पक्षाला भरभरून यश मिळण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर मनसे प्रभारी गणेश आप्पा सातपुते, रणजीत शिरोळे, किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघात येत्या १४ तारखेपासून सभासद नोंदणीस प्रारंभ करून, २०२२ च्या पालिका निवडणुकीत पालिकेवर भगवा फडकावण्याचा संकल्प या वर्धापनदिनी करीत आहोत.

– नगरसेवक,सचिन चिखले 

 

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous article#PIMPRI : वायसीएम रुग्णालयात अमिलोब्लास्टोमा या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया
Next article#PIMPRI : पंतप्रधानांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत सक्षम धोरण राबवावे : गिरीजा कुदळे