शाला बाह्य विद्यार्थी सर्वेक्षण : कोरोना कालावधीत शिक्षकांच्या जीवाशी खेळ नको – नगरसेविका प्रियांका बारसे

0
30
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

प्रशासन अधिकारी जोस्ना शिंदे यांना नगरसेविका प्रियांका बारसे यांचे निवेदन

शबनम न्युज / पिंपरी

शालाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी पिचिमनपा च्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योस्ना शिंदे यांनी आदेश काढला असुन ३ मार्चपासुन सर्वेक्षणास सुरुवात करण्याची त्यांत सुचना आहे.

खरंतर कोरोना विषाणुचा संसर्ग वाढीस लागला आहे.त्यामुळे सुरू झालेल्या शाळा परत बंद करण्याच्या सुचेना शाळांना दिलेल्या.

नेहमीच शिक्षक वर्गाला अशा शैक्षणिक -अशैक्षणिक काम सांगिछले जाते.व शिक्षकही कामेही प्रामाणिकपणे करतात.
आज शाळा बंद असल्यातरी शाळा परत केव्हाही सुरू होऊ शकतात.अशा वेळी स्वतःची सुरक्षा पाहणेही महत्त्वाचे आहे.
सर्वेक्षण करताना कोरोनाचा संसर्ग झाला लक्षात नाही आला तर शाळा परीसरात आल्यावर इतर शिक्षक व विद्यार्थ्यांना लागण होऊ शकते.

मागील ५-६ महिन्यांपूर्वी अशीच मनपा‌ कर्मचारींना कोरोना कालावधीत सर्व्हे करण्याचे काम देण्यात आले होते .
ती कामे करताना काही कर्मचारी मयत झाले होते.त्यांच्या कुटुंबाला अद्यापपर्यंत महानगरपालिकेने जाहीर केलेली आर्थिक मदत मिळालेली नाही.

जर शिक्षण विभाग व महानगरपालिका कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी काही करू शकत नसतील तर या कोरोना काळात शिक्षकांचा जीव धोक्यात घालण्याचा कोणालाही अधिकार नाही

तरी माननीय प्रशासनाधिकारी शिक्षण विभाग मनपा यांनी शालाबाह्य विद्यार्यांचे सर्वेक्षण सर्वेक्षण करण्याचा आदेश मागे घ्यावा. किंवा त्यांचे जिविताची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण विभागावर व महानगरपालिकेवर राहील असे लेखी द्यावे.

शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी सुद्धा शालाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण कोरोना कालावधीत शिक्षकांना देऊ नये असे जाहीर केलेले आहे. शिक्षण समितीसमोर हा विषय मांडुन मंजुर करण्यात‌ आलेला आहे अशी माहिती नगरसेविका प्रियांका बारसे यांनी दिली आहे.

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous article#PIMPRI : महापालिकेच्या सांस्कृतिक हॉलचा (ध्यानकेंद्र) लोकार्पण सोहळा समारंभ महापौरांच्या हस्ते संपन्न
Next articleमहापालिकेची भाजी मंडई विकसित करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ महापौरांच्या हस्ते संपन्न