नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या तत्परतेमुळे मोठ्या अपघाताच्या घटना टळल्या

0
194
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्युज / पिंपरी

पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील पिंपळे सौदागर येथील पि.के चौकामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडल्यामुळे रहदारी करिता अडचण निर्माण झाली. वाहनचालकांच्या गाड्या नियंत्रण सुटून घसरू लागल्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता होती. परंतु, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व या प्रभागातील नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी तत्परता दाखवत अग्निशमन विभागाला त्वरित सूचना देऊन दखल घेण्यास भाग पाडले. व रस्त्यावरील ऑइलवर माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. यावेळी नाना काटे यांनी स्वतः उभे राहून सदरचे काम करून घेतले. प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नाना काटे यांचे आभार व्यक्त केले.

 

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous articleकामगारांना सूरक्षतेची शपथ देऊन ,प्रात्यक्षिकाद्धारे,वेगवेगळ्या स्लोगनद्धारे ,भिती पत्रकाद्धारे,राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा