#FILMI NEWS : ‘मन हे वेडे’ या रोमँटिक गाण्यात स्मिता शेवाळे आणि रोशन विचारे झळकणार एकत्र

0
100
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
  • आता होणार प्रेमाची जादू, स्मिता शेवाळे आणि रोशन विचारेच्या रोमँटिक मन हे वेडे या गाण्यासह
  • हा नोव्हेंबर घेऊन येणार प्रेमाचा बहर, स्मिता शेवाळे आणि रोशन विचारेच्या रोमँटिक मन हे वेडे या गाण्यासह

फिल्मी दुनिया / शबनम न्युज

प्रेम एक अशी भावना आहे ज्यापुढे सगळच फिकं आहे. पाडगावकरांनी सांगितलच आहे, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. हे पहा किंवा अनेक कवींनी, गीतकारांनी सांगितलेली प्रेमाची महती बघा, प्रेम तेच पण प्रत्येक वेळी एक नवी अनुभूती देऊन जातं. असाच पुन्हा एकदा हळुवारपणे तुमच्या मनाला प्रेमाने स्पर्श करण्यासाठी निर्माते श्रीनिवास कुलकर्णी स्मिता शेवाळे आणि रोशन विचारे सह घेऊन येत आहेत एक सुंदर रोमँटिक गाणं मन हे वेडे. हा नोव्हेंबर महिना घेऊन येणार प्रेमाचा बहर. स्मिता शेवाळे आणि रोशन विचारे या दोन लोकप्रिय कलाकारांच्या फ्रेश जोडीवर हे गाणं चित्रित झाल्यामुळे या गाण्याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या नोव्हेंबर महिन्यात हे गाणं सगळ्या संगीत वाहिन्या आणि युट्युबवर प्रदर्शित होईल.

‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री स्मिता शेवाळे नुकतीच ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. चॉकलेट बॉय रोशन विचारे या पूर्वी ‘श्री लक्ष्मीनारायण’ या मालिकेतून श्री नारायणांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे आणि लवकरच त्याची नवी मालिका ‘तुझं माझं जमतय’ झी युवावर सुरू होणार आहे. या सगळ्यात गमतीशीर किस्सा असा की स्मिता आणि रोशनच्या या पूर्वीच्या मालिकेत हे दोन्ही कलाकार माय-लेकाच्या भूमिकेत झळकले होते.

सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत रोशन विचारेने शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली होती तर स्मिता शेवाळेने त्यांच्या मातोश्री म्हणजेच ऊमाबाईंची भूमिका साकारली होती. या दोघांच्या या भूमिकांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते त्यामुळेच आता दोघानींही जोडी म्हणून रोमँटिक गाण्यातून प्रेक्षंकाच्या समोर येणे आव्हानात्मक होते. पण या दोन्ही उमद्या कलाकारांनी हे आव्हान लीलया पेलले आहे. यावेळी त्यांची एक नवी केमिस्ट्री आणि एक वेगळी बाजू पहायला मिळेल.

मन हे वेडे या गाण्याची निर्मिती श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली असून त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट म्हणजे स्वप्नपूर्ती आहे. या गाण्याविषयी बोलताना ते सांगतात, “हे खूप हळुवार आणि रोमँटिक गाणं आहे. आयुष्यात अनेकदा असं होतं की आपल्याला प्रेम व्यक्त करता येत नाही, अशा अनेक गोष्टी असतात ज्या बोलता येत नाहीत. प्रेमात प्रचंड ताकद आहे. मन हे वेडे गाणं अशाच अनेक अव्यक्त भावनांना प्रेमाचा हळुवार स्पर्श करतं, पुन्हा एकदा तुम्हाला प्रेमाची ती जादू अनुभवायला लावतं. मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की हे सुंदर गाणं साकारण्यासाठी मला स्मिता शेवाळे आणि रोशन विचारे सारखे सुरेख कलाकार मिळाले. हे गाणं आम्ही नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित करतो आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना ते नक्कीच आवडेल.”

मन हे वेडे या गाण्यात ऐश्वर्या माने आणि पुजा चाफेकर यांची देखील झलक पहायला मिळणार आहे. या गाण्याचं दिग्दर्शन योगेश अनिल तावर यांनी केलं असून डि.ओ.पी. राहुल झेंडे आहेत. या गाण्याला आपल्या सुरेल आवाजाने अन्वेशाने स्वरबद्ध केला असून जीवन मराठेने संगीतबद्ध केले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन देवश्री आठल्ये यांनी केले असून वेशभूषा श्वेता तातूसकर आणि रंगभूषा हर्षद खुले यांनी केली आहे. निर्मिती प्रमुख वैभव लामतुरे तर कार्यकारी निर्माता म्हणून अमोल घोडके यांनी कार्यभार सांभाळला आहे. मन हे वेडे हे गाणं पुण्यातील नयनरम्य अश्या स्नॅपसिटी, तळेगाव या ठिकाणी चित्रीत झाले आहे.

 

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous article#PIMPRI : सणासुदीच्या काळात भटक्या मेंढपाळावर उपासमारीची वेळ
Next article#PUNE : कोरोना प्रतिबंधक लस उपलब्धतेनंतर ती जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून पूर्वतयारी- जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख