Sun. Sep 20th, 2020

क्रांतिवीराचा अपमान करू नका, होडी़ंगचे काम त्वरित थांबवा

शबनम न्युज : १५ सप्टेंबर (प्रतिनिधी) पिंपरी :- चिंचवड स्टेशन येथील वस्ताद लहुजी साळवे व क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळा मागील होडी़ंगचे काम, त्वरित थांबवावे, क्रांतीविरांचा अपमान करू नका अशा कठोर शब्दात अनुराधाताई गोरखे यांनी आयुक्तांना निवेदन पाठवले आहे.

 

 

 

माझ्या प्रभागातील चिंचवड स्टेशन येथे चौकामध्ये क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे व क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे 1985 पासून ऐतिहासिक पुतळे असून दोघेही क्रांतिवीर समाजाची प्रेरणा आहेत नुकतेच या दोन्ही क्रांतिवीरांच्या स्तुती स्थळांना सुशोभीकरणासाठी माझ्या पाठपुराव्याला अखेर यश आले व 38 लाख रुपये मंजूर केले असून त्याचे महापालिकेने टेंडर ही काढले आहे..

परंतु ज्या ठिकाणी हे स्मृतिस्थळ आहे त्याच्या बरोबर मागे आकाश चिन्ह परवानाद्वारे मोठे लोखंडी होडी़ंगचे काम चालू आहे पुतळ्याच्या सुशोभिकरणाला या नवीन चालू असलेल्या होडी़ंगचे कामामुळे अडथळा येऊ शकतो म्हणून हे काम त्वरित थांबवावे व या दोन्ही क्रांतिवीरांवर समाजाची निष्ठा असल्याने हे काम थांबलेच पाहिजे नाही तर समाजाच्या भावनेचा उद्रेक होईल असे नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांनी आयुक्त श्री हर्डीकर यांच्याकडे मागणी केली आहे.

शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा,  (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!