Mon. Oct 26th, 2020

विभागात कोरोना बाधित 3 लाख 65 हजार 971 रुग्ण – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे विभागातील 2 लाख 77 हजार 860 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले

शबनम न्युज : १९ सप्टेंबर (प्रतिनिधी) पुणे :- पुणे विभागातील 2 लाख 77 हजार 860 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 65 हजार 971 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 78 हजार 643 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 9 हजार 468 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.92  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

 

 

 

 

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 44 हजार 516  रुग्णांपैकी 1 लाख 96 हजार 559 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 532 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.22  टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 80.39 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 28  हजार 153 रुग्णांपैकी 19 हजार 57 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 289 आहे. कोरोनाबाधित एकूण 807 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 27 हजार 681 रुग्णांपैकी 19 हजार 84 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7  हजार 595 आहे. कोरोनाबाधित एकूण 1002 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 27 हजार 691 रुग्णांपैकी 16 हजार 903 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 750 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 37 हजार 930 रुग्णांपैकी 26 हजार 257 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 477 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 196 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

            कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 7 हजार 266 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4  हजार 93, सातारा जिल्ह्यात 790, सोलापूर जिल्ह्यात 660, सांगली जिल्ह्यात 1 हजार 10 तर कोल्हापूर जिल्ह्यात 713 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

            आजपर्यत विभागामध्ये एकुण 15 लाख 99 हजार 234 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 65 हजार 971 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा,  (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.

 

#PUNE : लोणी येथे सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज स्पोटर्स अकॅडमी उभारणार – पुनीत बालन

#PIMPRI : नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत विविध योजनांचे नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

#PIMPRI : आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करत आहोत आपणही करा ; राहुल कलाटे यांचे फलकाद्वारे नागरिकांना आवाहन

ताज्या बातम्या

#PUNE : लोणी येथे सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज स्पोटर्स अकॅडमी उभारणार – पुनीत बालन

#PIMPRI : नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत विविध योजनांचे नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

#PIMPRI : आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करत आहोत आपणही करा ; राहुल कलाटे यांचे फलकाद्वारे नागरिकांना आवाहन

error: Content is protected !!