Mon. Oct 26th, 2020

किनाळा येथील मुस्लिम गल्लीत अनेकांच्या घरात नालीचे पाणी शिरून आरोग्य धोक्यात : गांधी जयंती पासून अमरण उपोषणाचा इशारा

शबनम न्यूज : 19 सप्टेंबर (प्रतिनिधी) नांदेड :- किनाळा तालुका बिलोली येथील मुस्लिम गल्लीतील अनेकांच्या घरात नालीचे घाणपाणी शिरत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात येन्याची भिती निर्माण झाली असताना घरासमोरच्या नालीचे पाणी साचुन गावात जानार्या मुख्य रस्त्यावर गुडघ्या ईतके पाणी साचल्याने अनेक मोटारसायकल चालकांना आपला जिव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने बाहेर कोरोना व घरात नालीचे घाणपाणी शिरत असल्याने याकडे संबंधितांनी तात्काळ लक्ष देउन नालीचे घाण पाणी वाहते करावे असी मागणी येथील नागरिकांनी अनेकवेळा करूनही याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याने येथील अनेकांचे आरोग्य धोक्यात येन्याची भिती निर्माण झाली असल्याने याकडे संबंधितांनी लक्ष ध्यावे अन्यथा दि.2 ऑक्टोबर रोजी गांधीजयंती दिनापासून येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करन्यात येईल असा इशारा जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे पत्रकार मनोहर मोरे यांनी दिले आहे .

 

 

 

किनाळा तालुका बिलोली येथील गावात जानार्या मुख्य रस्त्यावर असलेल्या मुस्लिम गल्लीत नालीचे घाण पाणी घरात येत असल्याने येथील अनेकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने या नालीच्या साचनार्या घाण पाण्याची विल्लेवाट लावावे असी मागणी 31 ऑगस्ट 2012 पासून ते आजपर्यंत सुमारे आठ वर्षापासून वारंवार करूनही याकडे ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकार्यांचे लक्ष नसल्यामुळे निरोगी आरोग्यासाठी सदरील नालीच्या साचनार्या घाण पाण्याची विल्लेवाट लावावे यासाठी येथील मुस्लिम बांधव ग्रामपंचायत कार्यालयाकडे गेल्या आठ वर्षांपासून मागणी करून थकले परंतू त्यांच्या कडे अध्याप कोणीही लक्ष देन्यास तयार नाही.
नांदेड-देगलुर राज्यमहामार्गावर असलेल्या किनाळा गावातील गावात जाणारा मुख्य सिंमेट रस्ता असून याच रस्त्याच्या बाजूनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नाली बांधकाम करण्यात आले आहे मात्र या नालीचे पाणी गावाबाहेर किंवा कुठल्याही नाल्या पर्यंत न जाता वार्ड क्र.1 मध्ये असलेल्या मुस्लिम गल्लीत नालीचे पाणी साचत असल्याने दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या नालीचे घाण पाणी अनेकांच्या घरात येत असल्याने कित्येकांचे आरोग्य धोक्यात येत असून नालीच्या साचनार्या घाण पाण्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होउन अनेकांना डेंगु ताप अनेकांना अनेक वेळा विविध अजार होउनही याकडे प्रशासना कडुन दुर्लक्ष केल्या जात असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
वार्ड क्र 1 मध्ये असलेल्या नालीचे पाणी साचून येथील मुस्लिम समाजातील लहान मोठ्या बालकांचे घाणीच्या साम्राज्याने आरोग्य बिघडत असल्याने या नालीच्या साचनार्या घाण पाण्याची विल्लेवाट लावावे असी मागणी 31 ऑगस्ट 2012 पासून ते आतापर्यंत जवळपास आठवर्षापासून ग्रामपंचायतआणी पंचायत समितीसह तहसिल कार्यालय बिलोली यांना अनेकवेळा लेखी निवेदन देऊन ग्रामपंचायतीकडे वारंवार विनंती करूनही याकडे ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकार्यांचे लक्ष नसल्यामुळे येथील मुस्लिम बांधव घराबाहेर कोरोना आणी घरात नालीचे साचनार्या घाण पाण्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होउन विविध आजारानी अनेकांची आरोग्य बिघडत असल्याने ऐरवी मतासाठी आमच्या गल्लीत येउन मत मागनार्या लोकप्रतिनिधीना आमच्या घरात घुसनारे नालीचे घाणपाणी दिसत नाही काय असा प्रश्न अनेकांना पडला असून यासंबंधी गावात येनारया रस्त्याचे पाणी उताराने गल्लीच्या नालीतुन बाहेर जान्यासाठी कसलाही मार्ग नसल्याने या तुबंनार्या नालीचे पाणी बाहेर काढून देन्यासाठी येथील ग्रामपंचायतीने तुटपुंजे प्रयत्न करून यावर कसलाच ठोस निर्णय न घेतल्यामुळे दरवर्षी पाउसाळ्यात या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे.
एकीकडे रस्त्याचे व नालीचे घाण पाणी गावाबाहेर जाण्यासाठी कसलाही मार्ग नसल्याने नाली व रस्त्यावर दरवर्षी पाउसाळ्यात साचनारे पाणी अनेकांच्या घरात शिरत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात येत असते आणी गावात जानारा मुख्य रस्त्यावर गुडघ्याला पाणी साचल्याने त्याच पाण्यातुन गावातील नागरिकांनाही जावे लागते त्यामुळे च्यार महिने पाउसाळ्यात येथील नागरिकही कसेबसे दिवस काढतात आणी उनाळा ,हिवाळा ही आठ महिने याकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे आता घराबाहेर कोरोना आणी घरात नालीचे घाणपाणी यामुळे येथील मुस्लिम गल्लीत अनेकांचे आरोग्य धोक्यात येन्याची भिती निर्माण झाली असुन याकडे संबंधितांनी तात्काळ लक्ष देउन साचनारे नालीचे घाणपाणी वाहते करून ध्यावे असी मागणी वारंवार येथील नागरिकाने करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधितांनी तात्काळ या कडे लक्ष देउन येथील नागरीकांची होनारी गैरसोय सोडवावे अन्यथा 2 ऑक्टोबर रोजी गांधीजयंती दिनापासून येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करन्यात येईल असा इशारा पत्रकार मनोहर मोरे. सदाशिव दामोदर पांचाळ गुणवंत दामोदर पांचाळ . सय्यद कासीममिरासाब.सय्यद इस्माईल सादकसाब.सय्यद सरवरसाब मोहिद्दीनसाब .सय्यद महम्मद मिरासाब .
सय्यद खादर हुशेनसाब .यांनी जिल्हा अधिकारी नांदेड,जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय नांदेड, तहसीलदार बिलोली, ग्रामपंचायत कार्यालय किनाळा, पोलिस स्टेशन रामतीर्थ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

 

#PUNE : लोणी येथे सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज स्पोटर्स अकॅडमी उभारणार – पुनीत बालन

#PIMPRI : नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत विविध योजनांचे नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

#PIMPRI : आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करत आहोत आपणही करा ; राहुल कलाटे यांचे फलकाद्वारे नागरिकांना आवाहन

ताज्या बातम्या

#PUNE : लोणी येथे सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज स्पोटर्स अकॅडमी उभारणार – पुनीत बालन

#PIMPRI : नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत विविध योजनांचे नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

#PIMPRI : आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करत आहोत आपणही करा ; राहुल कलाटे यांचे फलकाद्वारे नागरिकांना आवाहन

error: Content is protected !!