अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेतली जाणार – उदय सामंत
शबनम न्युज : १९ सप्टेंबर (प्रतिनिधी) मुंबई :- “करोनाच्या पार्श्वभूमीवर विलंब झालेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल १० ऑक्टोबरपासून लागण्यास सुरूवात होणार आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही,” असं स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलं. तसंच परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेतली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
नापास विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीनं महिन्याभरात घेतली जाईल आणि त्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल,” असं सामंत यांनी स्पष्ट केलं. “पदवीच्या प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही. गेल्यावर्षीप्रमाणेच हे प्रमाणपत्र देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी मनात कोणताही संभ्रम ठेवू नये,” असंही त्यांनी नमूद केलं.
शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा, (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.