Sun. Sep 20th, 2020

पुणे विभागातील 2 लाख 51 हजार 521 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 3 लाख  36 हजार 395 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

शबनम न्युज : १५ सप्टेंबर (प्रतिनिधी) पुणे :- पुणे विभागातील 2 लाख 51 हजार  521 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3  लाख 36  हजार 395 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या  76  हजार  141 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण  8 हजार 733  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण  2.60  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.77 टक्के आहे, अशी माहिती  विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

 

 

 

 

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  2 लाख  27 हजार  307 रुग्णांपैकी  1 लाख 81  हजार    315 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 881 आहे. कोरोनाबाधित एकूण 5  हजार   111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.25 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण      79.77टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 24  हजार 578  रुग्णांपैकी   15 हजार 594  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8  हजार  294 आहे. कोरोनाबाधित एकूण 690  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण   25 हजार  386  रुग्णांपैकी   17  हजार  601 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6  हजार 835 आहे. कोरोनाबाधित एकूण 950  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 24  हजार  39 रुग्णांपैकी  13 हजार  805  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार  341  आहे. कोरोनाबाधित एकूण  893  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 35  हजार  85 रुग्णांपैकी   23  हजार  206 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  10  हजार 790  आहे. कोरोनाबाधित एकूण  1 हजार  89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण  5 हजार  ने 256 वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 481 , सातारा जिल्ह्यात 629 , सोलापूर जिल्ह्यात 547, सांगली जिल्ह्यात  847  तर कोल्हापूर जिल्ह्यात  752 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 14 लाख  89 हजार 506 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3  लाख 36  हजार  395 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा,  (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!