Sun. Sep 20th, 2020

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यामुळे मिळाले कंत्राटी कर्मचा-यांना त्वरीत वेतन

शबनम न्युज : १५ सप्टेंबर (प्रतिनिधी) पिंपरी : महानगरपालिकेच्यावतीने शहरातील कचरा संकलन करणा-या अँन्टोनी एस.आर.एल. कंपनीच्या कंत्राटी कामगरांनी दिनांक १४/०९/२०२० रोजी पगार न झाल्यामुळे संप केला.  त्यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी त्याठिकाणी धाव घेऊन कामगरांच्या समस्या जाणून घेतल्या  त्यांच्या विनंतीवरुन या कर्मचा-यांनी काम सुरु केले.

 

 

 

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी व त्या कंपनीच्या वरीष्ठाशी संपर्क साधून या कामगाराचे वेतन त्वरीत देण्याबाबत आदेश दिले. महिन्याची १४ तारीख आली तरी या कष्टक-या कामगारांचा पगार अजून का केला नाही असा जाब विचारला.व यास जबाबदार कोण ? सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कचरा संकलनाचे काम जीव धोक्यात घालून करीत असताना या कर्मचा-यांचा पगार न झाल्यामुळे एक दिवसात वेतन देण्याबाबत बजावले. एक दिवासात वेतन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल  असा इशारा दिला. येथून पुढे वेळेवर वेंतन देण्याबाबत त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिका-यांना सुनावले  मा. विरोधी पक्षनेत्यांनी या कामगारांच्या इतर समस्याही जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा,  (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.

 

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!