Fri. May 29th, 2020

२२ मे रोजी मेरा अंगण मेरा रणांगण , महाराष्ट्र बचाव आंदोलन – चंदकांत पाटील

शबनम न्यूज : २१ मे ( मुंबई ) – कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे.अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे कि पहिला कोरोना पेशंट महाराष्ट्रात 9 मार्चला सापडला त्याच दिवशी केरळ मध्ये पहिला पेशंट मिळाला केरळमध्ये 70 दिवसांमध्ये 1000 पेशंटचा आकडा पार झाला नाही ,आणि महाराष्ट्रात ही संख्या 40 हजाराच्या दिशेने चालली आहे केरळमधील मृत्यू दर महाराष्ट्र च्या तुलनेत कमी आहे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी ठाकरे सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरले आहे आतापर्यंत भाजपने सहकार्याची भूमिका ठेवली होती परंतु आता भाजपाने महाराष्ट्र बचाओ आंदोलन सुरू केले आहे येत्या 22 मे रोजी सोशल डिस्टेन्ससिंग ठेवून निषेध व्यक्त व्यक्त केला जाणार आहे महाराष्ट्राने सर्वसामान्य जनतेसाठी कोणते हि पॅकेज जाहीर केले नाही, हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना सरकारने पॅकेज दिले पाहिजे ते दिले नाही येत्या 22 मे रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत ठाकरे सरकारविरोधात घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

ताज्या बातम्या