Mon. Jun 8th, 2020

पिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

शबनम न्यूज २९ मे ( पिंपरी चिंचवड ) – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिकांची अर्थिक स्थिती विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून मिळकतकर वसुली करताना शास्तीकर अथवा दंड आकारणी केली जाणार नाही. मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, तशा हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवडमधील नागरिकांकडून मिळकतकर वसुली करताना शास्ती अथवा दंड आकारला जावू नये, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे केली होती. यावर प्रशासनाचा महसूल वाढावा आणि मिळकतकर वसुली व्हावी. तसेच, कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना काहीप्रमाणात का असेना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की, महापालिका हद्दीतील निवासी/बिगरनिवासी मिळकतधारकांकडून करवसुली केली जाते. सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व लॉकडाउन घोषित केल्यामुळे नागरिक व उद्योजकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल व मे या दोन महिन्याच्या कालावधीत मिळकतकरापोटी भरणा कमी झाला आहे. मनपा हद्दीतील अनधिकृत बांधकाम करण्याऱ्या मिळकतधारकांना मिळकतकर व शास्तीकर लावलेला आहे. नागरिक मूळ मिळकतकर भरण्यास तयार आहेत. मात्र, करसंकलन कार्यालयाकडून मूळ मिळकतकर व शास्तीकर भरण्यासाठी नागरिकांकडे मागणी केली जात आहे. दोन्ही रक्कम भरण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे. परिणामी, शहरातील मिळकतधारकांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे, कोरोना विषाणु प्रादुर्भावामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी मिळकतकर वसुली होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.

शास्तीकर माफीबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा कायम…

पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची शास्तीकरामधून पूर्ण मुक्तता व्हावी, अशी आमची मागणी आहे. त्याबाबत आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. राज्य शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत महापालिका प्रशासनाने शास्तीकर आणि दंड वगळून मिळकतकर वसुली करता येईल का? याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर शास्तीकराबाबत राज्य सरकारचा आदेश येईपर्यंत मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे. यापुढील काळात पूर्ण शास्तीकरमाफीबाबत आम्ही पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली.

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे…

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला कोरोनविरुद्ध उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. मिळकतधारकांचीही आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरणा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.

 

#PUNE : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याची गरज

#PUNE : एकही नुकसनाग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये, काळजीपूर्वक पंचनामे करा – खासदार श्रीरंग बारणे

#PUNE : विधान परिषद सदस्यत्वासाठी राष्ट्रवादी चे प्रवक्ते विकास लवांडे इच्छुक

विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा उपक्रम यापुढेही सुरु ठेवावा -गृहमंत्री अनिल देशमुख

#PUNE : दलित पँथरच्या सामाजिक उपक्रमाची रामदास आठवले यांनी घेतली दखल!

ताज्या बातम्या

#PUNE : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याची गरज

#PUNE : एकही नुकसनाग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये, काळजीपूर्वक पंचनामे करा – खासदार श्रीरंग बारणे

#PUNE : विधान परिषद सदस्यत्वासाठी राष्ट्रवादी चे प्रवक्ते विकास लवांडे इच्छुक

विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा उपक्रम यापुढेही सुरु ठेवावा -गृहमंत्री अनिल देशमुख

#PUNE : दलित पँथरच्या सामाजिक उपक्रमाची रामदास आठवले यांनी घेतली दखल!