Fri. Jun 12th, 2020

नामदेव ढाकेंनी आपल्या कुवतीनुसार रहावे – विरोधीपक्ष नेते नाना काटे

शबनम न्यूज : पिंपरी ( प्रतिनिधी) दि.२९ : सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आपल्या कुवती नुसार राहावे असा टोला राष्ट्रवादी चे विरोधीपक्ष नेते नाना काटे यांनी लगावला आहे . आज जगताप डेअरी चौकातील पुलाचे उद्धघाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालक मंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते झाले या वर सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आक्षेप घेतला आहे या पार्श्वभूमीवर नाना काटे यांनी नामदेव ढाके यांना टोला लागवताना प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि दिनांक ०९/०३/२०२० रोजी जगताप डेअरी चौकातील पुलाचे उद्धघाटन महापौराच्या हस्ते काही नगरसदस्यांच्या उपस्थितीत अनधिकृतपणे करण्यात आले होते. वस्तुत: सदरचा पुल प्राधिकरणाचा असल्यामुळे आपण प्राधिकरणाच्या संबंधित अधिका-यांशी याबाबत वस्तुत: चर्चा करुन सदर पुलाचा उद्धघाटनाचा कार्यक्रम ठेवला पाहिजे होता तसेच पालिकेच्या विकास कामाचे भूमिपूजन अथवा उद्धघाटन करावयाचे असेल तर ते राजशिष्टाचाराप्रमाणे पालिकेचे सर्व पदाधिकारी तसेच विविध पक्षाचे गटनेते व प्रशासन यांच्याबरोबर मिटींग घेऊन सागोपांग चर्चा करुन सर्वानुमते दिनांक, वेळ व उद्धघाटन कोणाच्या हस्ते करावयाचे याबाबत सर्व पक्षीय निर्णय होऊन त्याप्रमाणे निमंत्रण पत्रिका छापून त्या कार्यक्रमास पूर्व प्रसिध्दी दिली जाते. परंतु आजच्या या उद्धघाटनाच्या कार्याक्रमासंबधी साधा निरोपही दिला गेला नव्हता. तसेच प्राधिकरणाच्या अधिका-यांनासुध्दा याबाबत कळविले नव्हते. त्यामुळे ते देखील या उद्धाघाटनास हजर नव्हते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

या पुलाच्या उद्धघटनाबाबत आम्ही यापूर्वीच म्हणजे दिनांक १०/०२/२०२० रोजी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन या पुलाचे काम पूर्ण झाले असल्यास उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री व पुणे जिल्हा पालक मंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते करणेबाबत कळविण्यात आले होते. परंतु त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार त्या पुलावर राडारोडा तसेच खड्डे बुजविलेले नाहीत. पुलावरील वायरींग अपूर्ण आहे. हे काम पूर्ण झाल्या नंतर लगेचच मा. पालक मंत्र्याची वेळ घेऊन सदरचे पुलाचे उद्धघाटन तातडीने करण्यात येईल असे सांगितले होते.

त्यानुसार प्राधिकरच्या अधिका-यांनी मा. अजितदादांची वेळ घेऊन आज उद्घाटन करण्यात आलेले आहे. मागील दोन महिने लॉक डाऊनमुळे या कालावधीमध्ये नागरीकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय झालेली नाही. तसेच कोरोनाचे सावट लक्षात घेऊनच मा. अजितदादांनी पिंपरी चिंचवड मनपास भेट देऊन कोरोना विषयक सर्व माहिती घेतली. व त्याबाबत आवश्यक त्या सुचना मा. आयुक्तांना दिलेल्या आहेत. मनपाचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची मा. पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या विरुध्द बोलण्याची कुवत नाही. व ती त्यांनी करु नये एवढेच या निमित्ताने त्यांना सांगू इच्छितो. असे नाना काटे यांनी सांगितले आहे

 

#PUNE : मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी

#PUNE : भारती विद्यापीठ आयएमईडीला 63 वे मानांकन

#PUNE : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाला ९९ वे मानांकन

#PUNE : नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द

#PIMPRI : मोठा धोका टाळण्यासाठी पिंपरी चिंचवडला पुन्हा लॉकडाऊनची गरज – नगरसेविका सिमा सावळे

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या रक्तदान शिबिरात १०३ रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग .

ताज्या बातम्या

#PUNE : मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी

#PUNE : भारती विद्यापीठ आयएमईडीला 63 वे मानांकन

#PUNE : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाला ९९ वे मानांकन

#PUNE : नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द

#PIMPRI : मोठा धोका टाळण्यासाठी पिंपरी चिंचवडला पुन्हा लॉकडाऊनची गरज – नगरसेविका सिमा सावळे