रमजान ईद आपल्याघरी राहूनच साजरी करा; आफताब सय्यद यांचे मुस्लिम बांधवांना आवाहन

शबनम न्यूज : २१ मे ( मावळ ) – ईद-उल-फित्र ची नमाज आपल्या घरीच पठण करुन येणारी रमजान ईद समाजातील गरीब गरजु लोकांना मदत करुन साजरी करण्याचे आवाहन मावळ रा.काँ. अध्यक्ष अल्पसंख्यांक आफताब सय्यद यांनी सर्व मुस्लिम बांधवांना केले आहे.
देशात आणि राज्यात कोरोना महामारीने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अश्या परस्थिती मध्ये आरोग्य विभाग, पोलिस कर्मचारी, प्रशासन आपल्या जीवाची तमा न बाळगता सर्व सामान्य नागरीकांना या कोरोना महामारी पासून वाचवण्यासाठी व या विषाणु चा प्रसार रोकण्यासाठी दिवस रात्र युध्द करत आहेत. जनता देखील आरोग्य विभाग व पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान करुन त्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करत आहे. लॉकडाऊन च्या या काळात अत्यावश्यक सेवा वगळता जवळजवळ सर्वच सेवा ठप्प आहेत. करोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता, फिजिकल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे त्यासाठी या वर्षात येणार्या धार्मिक प्रार्थना सर्वांनी आप आपल्या घरातच करणे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे जेणे करुन कोरोनाविरुद्धचा लढा हा मानवता, विज्ञानवादाच्या दृष्टिकोनातून तुम्हा आम्हाला जिंकता येईल.
यापूर्वीही अनेक संकटे महाराष्ट्राने परतवून लावली. आताही आपण सर्वजण, एकजुटीने, शहाणपणाने, घरातच थांबून, कोरोनाचे संकट परतवून लावता येणार आहे.
त्यामुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी संयम दाखवून, शासनाच्या नियमांच्या आधीन राहून, आम्ही संविधानाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करतो, हे कृतीतून दाखवून द्यावे व संपूर्ण जगाच्या कल्याणाची कामना करणाऱ्या भारतात आज शांतता, सद्भाव अधिक दृढ करण्याची आवश्यकता असून कोरोना प्रादुर्भाव लवकरात लवकर कमी होण्यासाठी आपण आपल्या पध्दतीने प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन मावळ रा.काँ. अध्यक्ष अल्पसंख्यांक आफताब सय्यद यांनी केले आहे.
या महामारीने जगात आत्तापर्यंत लाखो लोकांचे जीव गेलेले आहे. महाराष्ट्रात जवळपास 57 दिवस झाले संचारबंदी आहे. मोल मजुरी करणारे, कामगार वर्ग, गोरगरीबांचे व खाण्या – पिण्याचे हाल होत आहेत. या महामारीने महाराष्ट्रात देखील आत्तापर्यंत 1000 च्या वर निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. महाराष्ट्रातील जनतेसमोर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. गोरगरीब जनता बेहाल होत आहेत हे सर्व पाहता यावर्षी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साधे पणाने साजरी करवी, नमाज निमित्त एकत्र येऊ नये, आप आपल्या घरातच नमाज पठण करावे व गोर गरीब गरजु लोकांना मदत करुन येणारी रमजान ईद साजरी करावी असे आवाहन मावळ रा.काँ.अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष आफताब सय्यद यांनी सर्व मुस्लिम बांधवांना केले आहे.