Tue. Jun 16th, 2020

पुणे विभागातील 4 हजार 423 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

शबनम न्यूज २९ मे ( पुणे ) – पुणे विभागातील 4 हजार 423 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 8 हजार 981 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 147 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 197 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

 

 

 

 

 

 

 

 

यापैकी पुणे जिल्हयातील 7 हजार 200 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 3 हजार 848 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 37 आहे. कोरोनाबाधित एकूण 315 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 460 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 321, सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 100, कोल्हापूर जिल्ह्यात 9 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 452 कोरोना बाधीत रुग्ण असून 134 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 301 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 795 कोरोना बाधीत रुग्ण असून 314 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 409 आहे. कोरोना बाधित एकूण 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 98 रुग्ण असून 54 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 41 आहे. कोरोना बाधित एकूण 3रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 436 कोरोना बाधीत रुग्ण असून 73 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 359 आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 83 हजार 73 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 77 हजार 945 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 128 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 68 हजार 849 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 8 हजार 981 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

(टिप : – दि.29 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

 

#CORONAदिलासादायक : पुणे विभागामध्ये कोरोना बाधित बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.83 टक्के

#PUNE : आषाढीवारीच्या अनुषंगाने भाविकांना आवाहन

#PUNE : महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस 108 च्या कामकाजाची विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केली पाहणी

निगडी मुले १ शाळेत क्रमिक पाठयपुस्तक, शिल्लक तांदूळ वाटप

#PIMPRI : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहतुकीत तात्पुरतेबदल

#PIMPRI : जिजामाता रुग्णालय येथे आय.सी.यु. बेड हस्तांतरण कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

#CORONAदिलासादायक : पुणे विभागामध्ये कोरोना बाधित बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.83 टक्के

#PUNE : आषाढीवारीच्या अनुषंगाने भाविकांना आवाहन

#PUNE : महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस 108 च्या कामकाजाची विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केली पाहणी

निगडी मुले १ शाळेत क्रमिक पाठयपुस्तक, शिल्लक तांदूळ वाटप

#PIMPRI : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहतुकीत तात्पुरतेबदल