Thu. Aug 6th, 2020

बनावट स्वाक्षरीच्या आधारे, कागदपत्रांचा गैरवापर, करून बॅकेतुन काढले पावणे तीन कोटीचे कर्ज

शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि. २७) – कागदपत्रांचा गैरवापर करत आणि बनावट सह्या करून तिघांनी एकाच्या नावावर तब्बल दोन कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ‌याबाबत अतिष मोहन भालसिंग ( वय 30, रा. प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश सोंडेकर ( रा. स्पाईन रोड, मोशी) , आदित्य सेठीया आणि एसबीआय बँकेतील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ‌अतिष भालसिंग यांना चारचाकी मोटार घेण्यासाठी 30 लाखाच्या कर्जाची आवश्यकता होती. त्याकरिता त्यांची कागदपत्रे आरोपी सोंडेकर याने घेतली. ही कागदपत्रे एसबीआय बँकेत जमा केली. त्यांनतर बँकेचे व्यवस्थापक पाठकर यांनी भालसिंग याना फोन करून भाडेकरार, सातबारा, वीजबिल आदी कागदपत्रे मोबाईलवर मागवून घेतली. त्यानंतर पाठकर यांनी महागड्या गाड्यांची कागदपत्रे मागवून घेतली. पण घर पाहणी करण्यासाठी न येता पाहणी केल्याचे खोटे सांगत वीजबिल, इंडेक्स मागविले. परंतु, भालसिंग यांनी ही कागदपत्रे पाठवली नाहीत. ‌

भालसिंग यांनी सोंडेकर यांच्याकडे कर्जाबाबत विचारणा केली असता एसबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्ज मंजूर केले नाही. आपण दुसऱ्या बँकेतून कर्ज घेऊ असे सांगितले. त्यानंतर एसबीआय बँकेतून बोलत असल्याचा एक फोन आला. त्यांनी कागदपत्रे मागविल्याने भालसिंग यांनी कागदपत्रे पाठवली आणि कर्जाची रक्कम पाठविण्यास सांगितले. परंतु, माहिती पाठविली नाही. पुन्हा सोंडेकर यांच्याकडे कर्जाबाबत चौकशी केली असता कर्ज मंजूर होणार नसल्याचे सांगितले. ‌याप्रकरणी शंका आल्याने भालसिंग यांनी सी बिल्ड रिपोर्ट काढला. त्यावर एसबीआय बँकेचे 2 कोटी 70 लाख रुपयांचे ऑटो लोन काढल्याची माहिती समोर आली. त्यानंतर भालसिंग यांनी सोंडेकर याच्याशी संपर्क साधला असता दहा दिवसांत बंद करतो असे सांगितले.

भालसिंग याने एसबीआय बँकेच्या निगडी शाखेत जाऊन कर्ज आहे का? याची खात्री केली असता कारवर कर्ज काढल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी पुणे शाखेत धाव घेतली. त्यावेळी आरोपींनी कर्ज खाते बंद केल्याचे समजले. खोट्या कागदपत्राच्या आधारे कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!