Thu. Aug 6th, 2020

शाहनवाज शेख यांनी आभार व्यक्त करीत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

शबनम न्युज : भोसरी (दि. २७) – भोसरी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी वतीने निवडणूक लढविले उमेदवार शाहनवाज शेख यांनी आपल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी दिलेल्या असंख्य मतदाना करिता सर्वांचे आभार व्यक्त करीत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

भोसरी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी वतीने प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेले युवा नेते शाहनवाज शेख यांना 13000 मतदान मिळाले त्यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे, माजी आमदार राष्ट्रवादीचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांची तगडी लढत होती.

या लढतीमध्ये शाहनवाज शेख यांना तिसऱ्या क्रमांकाचे मते मिळाली निवडणुकीमध्ये हार-जीत ही होतच असते, परंतु या निवडणूक काळात सामान्य जनतेकडून मिळालेला प्रतिसाद व मिळालेली मते ही माझी पुढील राजकीय वाटचाली करिता मिळालेली एक ऊर्जा असल्याचे शाहनवाज शेख यांनी सांगितले आहे. तसेच सर्व भोसरी विधानसभा मतदार संघातील बंधू-भगिनींना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही त्यांनी दिले आहेत.

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!